इंदापुर: इंदापूर तालुका माळी सेवा संघ चे तालुका अध्यक्ष बापुसाहेब बोराटे यांची सोलापूर जिल्हा माळी सेवा संघच्या प्रभारी पदी निवड करण्यात आली आहे.बापुसाहेब बोराटे यांचे मुळ गाव इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली असुन त्यांना पहिल्यापासूनच समाजकारणाची आवड आहे,आजपर्यंत त्यांनी गावपातळीवर व तालुका पातळीवर समाज कार्य करत विविध पद भूषविली आहेत,ते आता इंदापूर तालुका माळी सेवा संघ चे अध्यक्ष व इंदापूर तालुका युवक काँग्रेस चे सरचिटणीस म्हणून काम करतात,त्यांनी या पदावर काम करताना सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याबरोबरच समाज संघटन मजबूत करून तालुक्यामध्ये माळी समाज्यातील युवकांना येकत्र करण्याचे काम केले आहे.
त्यांच्या याच कार्याबद्दल माळी सेवा संघ महा.राज्य संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय माळी ,महा.राज्य कायदेशीर सल्लागार ॲड. नितीन जी राजगुरू,महा.राज्य प्रसिध्दी प्रमुख नानासाहेब ननवरे यांनी त्यांना सोलापूर जिल्हा माळी सेवा संघ प्रभारी पद दिले आहे.
लवकरच सोलापूर जिल्ह्य़ातील सर्व पदाधिकारी व समाज बांधव यांच्या वतीने बापुसाहेब बोराटे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे अशी माहिती सोलापूर जिल्हा अध्यक्ष धनाजी जाधव यांनी दिली.
या वेळी सोलापूर जिल्हा पदाधिकारी अनिकेत अदलिंगे,गणेश म्हेत्रे,बापूसाहेब गवळी,प्रदीप देवकर,कल्याण माळी,पोपट गायकवाड,सुनिल जाधव व मोहोळ,सांगोला,माळशिरस,पंढरपूर,माढा या तालुक्यातील सर्व पदाधिकारी तसेच सामाज बांधव उपस्थित राहणार आहेत
महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेला इंदापूर तालुक्यातील चिंकारा हरीण शिकार प्रकरण पहा सविस्तर खालील लिंक👇https://youtu.be/bXXoCMMUxq0