इंदापूरकरांचे बारामतीचे हेलपाटे वाचवा- लोकसेवक गणपतराव आवटे फाउंडेशन ची लक्षवेधी मागणी

इंदापूर: इंदापूर तालुक्यामध्ये नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारामती यांनी इंदापूर येथे वाहन परवाना देण्याची सोय दर बुधवारी करण्यात यावी. गेले 20 ते 25 वर्षे इरिगेशन कॉलनी येथे आरटीओ चे कॅम्प होत होते.परंतु गेल्या काही महिन्यांपासून हे कँप बंद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य लोकांना लायसन्स व गाडी पासिंग साठी बारामतीला हेलपाटे घालावे लागतात. सद्यस्थितीमध्ये रस्त्याचे चालू असणारी कामे व उसाचे ट्रॅक्टर यामुळे अपघात होण्याचे प्रमाणही त्या रस्त्यावरून जाताना वाढले आहे त्यामुळे इंदापूर तालुक्याचा विचार करता हे कॅम्प पुन्हा पूर्ववत इंदापूर येथेच चालू करण्यात यावेत अशी मागणी इंदापूर तहसील कार्यालय इंदापूर यांना प्रत्यक्ष निवेदन व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारामती यांना ई-मेल द्वारे निवेदन देऊन लोकसेवक गणपतराव आवटे फाउंडेशन च्या मध्येमातून करण्यात आली आहे. यापूर्वीसुद्धा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाच्या वतीने तहसीलदार इंदापूर यांना याच प्रश्नाविषयी निवेदन देण्यात आले होते परंतु अद्याप पर्यंत हे काम पूर्ववत झालेले नाहीत. त्यामुळे लोकसेवक गणपत्राव आवटे फाउंडेशनच्या माध्यमातून ही झालेली मागणी इंदापूर तालुक्यातील जनतेसाठी नक्कीच लक्षवेधी ठरत आहे.यावेळी निवेदन देताना लोकसेवक गणपतराव फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष सागर आवटे, सरपंच राघू मदने,विकास व्यवहारे, विलास व्यवहारे, बापू गार्डे ,सुनील हागारे, सागर कदम, ऋषिकेश झगडे ,सोमनाथ लांडगे ॲड.आनंद केकान, विशाल करडे, दत्ता बांदल,राज गारदी, यांच्या उपस्थितीत निवेदन तहसील कार्यालय इंदापूर येथे व मेल द्वारे उपप्रदेशिक परिवहन अधिकारी बारामती यांना देण्यात आले.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here