संपूर्ण इंदापूर तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या भांडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक काल पार पडली.अतिशय अटीतटीच्या या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचा पराभव करत भांडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेवर सत्ता आणली अतिशय चुरशीची ही निवडणूक पार पडली भाजप तर्फे मा हर्षवर्धन पाटील साहेब व आप्पासाहेब जगदाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी विकास सहकार पॅनल उभा केला होता. अतिशय तगडे उमेदवार या पॅनलमध्ये होते तर राष्ट्रवादीकडून गोसावी महाराज शेतकरी विकास पॅनल मधून जशास तशी टक्कर देणारे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसनेही उभे केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने पॅनल प्रमुखांची जबाबदारी श्री सुभाष गायकवाड सर,श्री कैलास आप्पा शिंदे ,देविदास माने सर, नानासो ढुके, मा चेअरमन शिवाजी गायकवाड यांच्याकडे सोपवली होती हे सगळे पॅनल प्रमुख लोकांना विश्वास देण्यास यशस्वी ठरले आणि याच मुळे राष्ट्रवादी काँग्रेस विजय झाले 13 जागांसाठी ही निवडणूक पार पडली. पहिली एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसची बिनविरोध आलेली होती मतदान रूपात 12 जागांसाठी ही निवडणूक झाली या बारा जागांमध्ये अतिशय अटीतटीच्या लढती देऊन भाजपने सहा जागांवर तर राष्ट्रवादीने सहा जागांवर असे सम समान जागा मिळवल्या होत्या परंतु राष्ट्रवादीचा एक उमेदवार अगोदर बिनविरोध झाला होता त्यामुळे राष्ट्रवादीकडे सात जागा झाल्या आणि भाजप कडे 6 त्यामुळे सत्ता राष्ट्रवादीला मिळाली.विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे वीर अरुण निवृत्ती,ढुके निवृत्ती मारुती,परकाळे संजय मोतीराम, कदम आण्णासो पांडुरंग, गायकवाड केशव विष्णू,परकाळे अंकुश रामचंद्र,गायकवाड सुभाष श्रीरंग, वीर दत्तात्रय श्रीरंग, काळे रंजना दादा, गायकवाड शांताबाई शंकर, कोकणे सयाजी बाबुराव, शिंदे सचिन साहेबराव, राऊत गणपत तुकाराम असे हे विजयी उमेदवार आहेत.