इंदापूर:खेळ हे आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे कारण हे वेळेचे बंधन, धैर्य,शिस्त,गटामध्ये काम करणे हे शिकवतात. खेळ आत्मविश्वासाची पातळी वाढविण्यास आणि त्यामध्ये सुधारणा करण्यात मदत करते. खेळाचा नियमानं सराव केल्यावर आपण अधिक सक्रिय आणि निरोगी राहू शकतो. खेळ खेळल्यामुळे अनेक आजारांपासून सुरक्षित राहण्यात मदत मिळते.इंदापूर मधील युवा पिढी पुरूष/महिला क्रीडा क्षेत्राकडे जास्त वळत असून विविध क्रीडा स्पर्धांमध्ये रस दाखवत आहे.विविध खेळामध्ये एकाहून एक असे उत्कृष्ट खेळाडू आणि त्यांचे टॅलेंट पाहिला मिळत आहे, त्यांना कमी भासत आहे ते म्हणजे फक्त एका योग्य व्यासपीठाची.हीच बाब लक्ष्यात घेत ‘शौर्य प्रतिष्ठान’ ने एक व्यासपीठ निर्माण करत या खेळाडूंची कमी दूर केली आहे. शौर्य प्रतिष्ठान या व्यासपीठाच्या माध्यमातून ‘इंदापूर बॅडमिंटन स्पर्धा 2022’ या स्पर्धेचे आयोजन केले असून ही स्पर्धा इंदापूर तालुक्यात प्रथमच भरवली जात असल्याने या स्पर्धेविषयीची उत्कंठा स्पर्धकांमध्ये व प्रेक्षकांमध्ये वाढली आहे.सदरची स्पर्धा ही पुरुष व महिला या दोघांसाठीही आयोजित केली आहे अशी संयोजकांनी माहिती दिली. सदरच्या स्पर्धेचे नियोजन पूर्ण झाले असून नाव नोंदणी चालू आहे त्यामुळे त्वरित नाव नोंदणी करून घ्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभाग होण्यासाठी 3 ऑगस्ट पूर्वी खालील संपर्क नंबर वर संपर्क करून नोंद करून घ्यावी. असे आवाहन करण्यात आले आहे.
निखील कारंडे – 9665399239
शंतनु बाब्रस – 8484963004
विजय आवटे – 8484088297
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश प्रति फि – ५००/- ठेवली असून ३ ऑगस्ट नंतर नावे स्विकारली जाणार नाहीत म्हणून सर्व इच्छुक खेळाडूंनी आपली नावे लवकरात लवकर देऊन या संधी चे सोने करावे. असे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.सदर स्पर्धा हि राहुल सिनेमा शेजारी गुरूकृपा सांस्कृतिक भवन च्या इनडोअर हॉलमध्ये पंचाच्या उपस्थिती मध्ये होणार आहे या सदर स्पर्धेत प्रथम ३ क्रमांकास ट्रॉफी, प्रमाण-पत्र व क्रिडा संबंधित आकर्षक भेटवस्तू दिले जातील.अशी माहिती शौर्य प्रतिष्ठान चे सदस्यांनी दिली आहे.
Home Uncategorized इंदापुर शहरात प्रथमच शौर्य प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून बॅडमिंटन (Indoor) स्पर्धेचे आयोजन.इंदापूरकरांची उत्कंठा...