इंदापुरात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भाजप ओबीसी मोर्चा इंदापूर तालुका यांच्यावतीने तिरंगा मशाल फेरीचे आयोजन.

इंदापूर प्रतिनिधी:स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला इंदापूर मध्ये दिनांक १४ ऑगस्ट २०२३ रोजी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा इंदापूर तालुका यांच्यावतीने तिरंगा मशाल फेरीचे आयोजन भाजप इंदापूर तालुकाध्यक्ष ओबीसी मोर्चा पांडुरंग तात्या शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री ९ ते ११ या वेळेत आयोजित करण्यात आली. या तिरंगा मशाल रॅलीत तिरंगा झेंडे, मशाली घेऊन दर्गा मस्जिद चौक, कुरेशी गल्ली, नेहरू चौक, खडकपुरा ,कांबळे गल्ली, हायवे वरून नगरपालिका येथे फेरी आल्यानंतर त्याचे रूपांतर सभेत झाले. यावेळी पांडुरंग शिंदे ,जयवंत नायकुडे, आकांक्षा दाभाडे यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभक्तीपर आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग इंदापूरचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, क्रांतीज्योती विचार मंच महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी,विशाल फोंडे, राजू साळुंखे, मयूर शिंदे, सागर राऊत, गणपत पवार, तेजस शिंदे, हनीफ कुरेशी ,सलीमभाई बागवान ,अमजीत बागवान, सागर बागडे, ओमकार हिंगमिरे ,सिद्धार्थ खरवडे, गोरख शिंदे, शेखर राऊत, महेश ढगे ,विशाल राऊत व उपस्थित होते. दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी महात्मा फुले चौक माळी गल्ली इंदापूर येथे ध्वजपूजन स्वातंत्र्यसैनिक खंडू जंगलो शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले तर जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग इंदापूरचे संस्थापक अध्यक्ष जयवंत नायकुडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी देशभक्तीपर गीतावर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित यांना फळे वाटप, खाऊ वाटप करण्यात आले. तसेच इंदापूर शहरातील विधि पदविका नव्याने प्राप्त केलेल्या राजीव हिम्मतराव करडे, सिद्धार्थ सुरेश मखरे, सिद्धार्थ दादा मखरे, सोहम नामदेव घोडके विधी तज्ञांचा सत्कार माजी जिल्हा नियोजन सदस्य माऊली काका चौरे यांच्या हस्ते संपन्न झाला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here