विशेष प्रतिनिधी: नानासाहेब लोंढे
इंदापूर : इंदापूर शहरातील संत सावतामाळी महाराज मंदिरात ७२७ व्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते,
धन्य ते अरण, रत्नांचीच खाण। जन्मला निधान सावता तो।।
सावता सागर, प्रेमाचा आगर। घेतला अवतार माळ्या घरी।।
पुण्यतिथी कार्यक्रमात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले, यावेळी संत सावतामाळी महाराजांच्या प्रतिमेची नगर प्रदक्षिणा घालून अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता हभप, ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली.
यावेळी सामाजिक जीवनात आयुष्य घालवलेले मंदिर समितीचे सहसचिव ह भ प प्रल्हाद राऊत गुरुजींना मान्यवरांच्या हस्ते सन. २०२२ आदर्श समाजभुषण पुरस्कार आणि मानपत्र इंदापूर येथील संत सावतामाळी सेवाभावी संस्था, श्री संत सावतामाळी मित्र मंडळ माळी गल्ली इंदापूर, महात्मा फुले मित्र मंडळ सावतामाळीनगर, जय भवानी मित्र मंडळ अंबिकानगर, महात्मा फुले ग्रुप इंदापूर, श्री संत सावतामाळी तालीम संघ इंदापूर, भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट इंदापूर, कोटलिंगनाथ देवस्थान ट्रस्ट इंदापूर, शंभू महादेव कावड उत्सवसमिती अंबिकानगर. इत्यादी सामाजिक संस्थांच्या वतीने देण्यात आला. या मानपत्रात गुरुजींनी संत सावतामाळी मंदिरासाठी दिलेले योगदान आणि गुरुजींचे संघर्षमय आठवणींना उजाळा दिला आहे.यावेळी संत सावतामाळी इंदापूर संस्थेचे सदस्य श्री. भिमराव शिंदे, सल्लागार ॲड दत्तात्रेय राऊत, विश्व वारकरी संघटनेचे दशरथ भोंग,माजी नगराध्यक्षा उज्वला राऊत, भाजप ओबीसी सेलचे पांडुरंग शिंदे , नगरसेवक श्री.पोपट शिंदे, नगरसेवक श्री.स्वप्निल राऊत ,माजी नगरसेवक श्री. अनिल राऊत , दक्षता समितीचे रमेश शिंदे, राजकुमार राऊत, पै.मारुती शिंदे ह.भ.प बलभिम राऊत, श्री मोहन राऊत गुरुजी, श्री मोहन शिंदेचालक ह भ प. सुनिल महाराज बारवकर यांसह विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.