इंदापूर शहरांमध्ये संविधान चौकात काल सकाळपासून स्वारगेट-सोलापूर ही शिवशाही बस बंद अवस्थेत रस्त्याच्या मधोमध लागलेली आहे. कालपासून या बसमुळे तीन किरकोळ अपघात झाल्याचे स्थानिकांकडून समजते यामध्ये काल दुपारी एका लहान मुलास किरकोळ दुखापत झाल्याचे बोलले जाते आहे.
संविधान चौक हा इंदापूरातील वरदळीचा चौक आहे या चौकात अकलूज,बारामती कडून येणाऱ्या गाड्या त्याचप्रमाणे पुण्याहून सोलापूरकडे जाणाऱ्या व सोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यांची गर्दी असते त्याचप्रमाणे तहसील ऑफिस व वेगवेगळ्या बँका याच चौकाच्या जवळ असल्यामुळे येथे नेहमीच गर्दी असते व येथे किरकोळ अपघातही सतत होत असतात.त्यातच आता ही शिवशाही 24 तास होत आहेत तरीही जागेवरून हलवली नाही किंवा साईडला पार्किंग केलेली नसल्याने महामंडळ मोठ्या अपघाताची तर वाट पाहत नाही ना? असाच प्रश्न पडतो. रस्त्याच्या मधोमधच ही बस बंद पडल्याने अवजड वाहन त्या साईडने नेण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
आज सकाळी 7 वाजता ही गाडी ड्रायव्हर नसताना चालू अवस्थेत असलेली सुद्धा निदर्शनास आली त्यामुळे या गाडीमध्ये कोणी कर्मचारी झोपला तर नसेल आणि गाडी चालू ठेवून झोपणं कितपत योग्य असा प्रश्न पडतो.ही गाडी बंद झाल्यानंतर गाडीच्या मागील बाजूस काही अंतरावर अपघात होऊ नये म्हणून कोणत्याही प्रकारची सूचना फलक लावलेला नाही. त्यामुळे शिंदें सरकारची शिवशाही आता राम भरोसे झाली की काय? असे वाटू लागले आहे.