इंदापुरमध्ये होणार आज भव्य ‘नोकरी महोत्सव’,तालुक्यातील हजारो युवक-युवतींना नोकरीची संधी.ना.रा. पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचा कौतुकास्पद उपक्रम.

आज शनिवार दि.18 जून रोजी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष गोकुळदास शहा यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नारायणदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने युवक आणि युवतींच्या उज्वल भविष्यासाठी शनिवारी (१८ जून) इंदापूर येथील शहा सांस्कृतिक भवन येथे भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडणाऱ्या या नोकरी महोत्सवात मॅन्युफॅक्चरिंग, बँकींग, फार्मा, फायनान्स रिटेल, आयटी, बी.पी.ओ., के.पी.ओ., हाॅस्पॅलिटी आदी क्षेत्रात आठवी ते दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा तसेच पदवी, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झालेल्या युवक आणि युवतींना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या इंदापूर तालुक्यातील हजारो युवक आणि युवतींना फायदा होणार आहे. इच्छुक युवक आणि युवतींनी आपल्या आवश्यक कागदपत्रांसह कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांनी केले आहे. तत्पूर्वी उमेदवारांना ९९२१७७७८८९ अथवा ९६६५१८६५४५ या नंबरवर नोंदणी करावी लागणार आहे एकूणच वाढदिवसाचा बेसुमार खर्च वाचवून बेरोजगार लोकांना रोजगार मिळवून देण्याच्या हेतूने केलेला हा उपक्रम खूप आदर्शवत मानला जात आहे आणि या उपक्रमाचे कौतुक ही केले जात आहे.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here