इंदापुर: राज्यात वाईन विक्रीचा निर्णय झाला आणि वेगवेगळ्या स्तरातून या बाबतच्या प्रतिक्रिया तीव्र उमटण्यास सुरुवात झाली अशीच एक रोखठोक प्रतिक्रिया इंदापूर नगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रशांत दादा शिताप यांनी दिली.नेहमीच आपल्या खास शैलीत व रोखठोक बोलण्यात तरबेज असलेले प्रशांत दादा शिताप यांनी राज्य शासनाला चक्क ५ मागण्या केल्या आहेत व या ५ मागण्या मान्य केल्यास शासनाचा आणखी फायदा होईल असेही सुचवलेला आहे त्याचप्रमाणे वाईन विक्री हा निर्णय व त्या पाठीमागे ची पार्श्वभूमी हेसुद्धा सविस्तर स्वरूपात प्रशांत दादा सिताप यांनी सांगितले आहे ते आपण आता सविस्तरपणे वाचू, जनता एक्सप्रेस मराठी न्यूज बरोबर बोलताना दादा शिताप यांनी खालील बेधडक मत जसेच्या तसे आम्ही आपल्यासमोर मांडत आहोत.” जागतिक महासत्ता बनू पहाणार्या या भारतभूमीच्या 73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या अमृत मोहत्सवी पुर्वसंध्येला महाराष्ट्र राज्याने घेतलेला हा क्रांतिकारी निर्णय खरोखरच कौतुकास्पद आहे.आजचा हा निर्णय एका रात्रीत झालेला निर्णय नाही त्या मागचा संघर्ष खुप मोठा आहे या लोकांचा,तूमच्या समोर मांडावा म्हणतो.कोरोना सारख्या वैश्विक संकटाच बऱ्या पैकी सर्वच व्यापार व्यावसायाचे कंबरडे मोडलेले असताना हा वाईन विक्रीचा खूळ बाजारीकरण एक आशेचा किरण वाटतोय.तसेही गाव खेड्यात शहरात आमदार खासदार नेते मंडळी नगरसेवक यांचीच दारूची दुकान लायसन्स आहेत.पूर्वीच्या काळात दारू विक्रीला प्रतिष्ठा नव्हती नैतिकता नव्हती त्यांना कधी व्यापारी व्यावसायिक म्हंटल जायच नाही.. पैसा चिक्कार पाळून लोकांच्या जमिनी लूबाडून गुंडगिरी करून हळूहळू लोकशाहीच्या मार्गाने ते राजकारणात आले.राजकारणात आले कूठले आपण तूम्ही आम्ही लाचार गरीब लोकांनी त्यांना बोकांडी घेतलय.या ऐतिहासिक निर्णयाला ट्रोल करताना निषेध करताना जरा आपल्या आंतरंगात झाकून बघा… पांढरी कपडे चकचकीत गाड्या टोलेजंगा इमारती रूबाबदार व्यक्तिमत्व ,सोने चांदी चे दागिणे पण सदैव नम्र विनयशिल,धार्मिकतेचा मुखवटा पांघरून समाजात वावरणारे हे लोकशाहीचे बलात्कारी आपण ओळखलेच नाहीत..कंबर मोडेस्तोपर वाकून आपल्याच बापजाद्यानी यांना नेता,पुढारी,नगरसेवक केल.गणपती वर्गणी,देणग्या गावगुंडाना मदती, पार्ट्या, छोटे मोठी सामाजिक काम जेवनावळी, पंगती, सप्ताह, देणग्या दिल्या की हे झाले अन्नदाते, दाणशुर,अलाना- फलाना नेते अध्यक्ष, आमूक-तमूक दारूवाला ही प्रतिष्ठा लफवण्यासाठी यांना मग बाकी व्यवसाय चॅरिटी चालू करावी लागते.पै पाहूण्यात माझ्या आंगाला पैशाला दारूचा वास तर येत नाहीना याची हमेशा काळजी.. मग देव तिर्थक्षेत्र साधु महाराज यांचा सहारा घेतला जातो. ऊपासतापास सत्संग धार्मिक सहलीच आयोजन झाल की मग आमदार खासदार बडे नेतै यांच्या गाठी-भेटी त्यांना आमंत्रण निमंत्रण ऊद्घाटन त्यांच बोट पकडून चपला ऊचलून प्रसंगी ढुंबर धूवून गावनेता बनायच राजकारणात आपल अस्तित्व वाढावयच…त्यासाठी पद्धतशिर जातीचा समाजाचा, देवाचा, धर्माचा आणि सरते शेवटी गरीबांच्या लाचारीचा आणि मजबूरीचा फायदा घ्यायला हे दारू विक्रेते मागे पुढे पहात नाहीत.हा क्रांतिकारी दिवस एका दिवसात नाही झाला या आगोदर कित्येक वर्षे हजार पाचशेच्या नोटानी आपण ,तूम्ही आम्ही आम जनतेने हा लोकशाही वरचा बलात्कार पूसून झाकोळोन काढलाय..
तो प्रत्येकजन याला जबाबदार आहे ज्याने हा हारामचा पैसा वाकून लाचार होवून दारूमटका झूगार गुटखाचावास घेतलाय.. प्रत्येकजन ज्याने या लोकांच्या धार्मिक सहली पंगती भोगल्यात..ते प्रत्येक जन ज्याःनी पैसे भेटवस्तू घेवून या़ना गावनेते केले प्रतिष्ठा दिली.ते प्रत्येकजण ज्यांनी यांची बेगडी प्रतिष्ठा समाजसेवा याला प्रसिद्धी प्रतिष्ठा दिली.ते प्रत्येक जन ज्यांनी यांची चीरी मिरी हप्ते खावून यांना क्लिन चीट..ज्या पक्षानी पार्ट्यानी यांना तिकीट दिली नेते बनवल.आता शासनाला कळकळीची विनंती वाईन विक्रेते बनवून तूम्ही जसे बारिक मोठ्या किराणा दुकानदारांना सामाजिक प्रतिष्टा आणि आर्थिक ऊभारी द्यायचा प्रयत्न केला आहे..🪴तसाच या महाराष्ट्रातील गोरगरीब शेतकर्यांना गांजा चरस याची शेती करून सधन व्हायची संधी द्यावी हळू हळू त्यांना ही राजकारणात घ्याव ही पहिली मागणी आहे.
🥃 मागणी नंबर दोन..
शासकीय कार्यालयात लाच स्विकारणे घेणे देणे आधिकृत करून त्या वर जीएसटी- फीएसटी लावून सरकारी तिजोरीमध्ये धनराशींचा संचय वाढवावा.
मायबाप सरकार तीसरी मागणी..
🥃हे दारू नको दुध प्या..🥛
व्यसनमुक्ती प्रवचन कार्यशाळा या वर बंदी घालून असे कार्यक्रम करणाऱ्यांवर देश द्रोहाचे गुन्हे दाखल करावे..
🥃 मागणी नंबर.४..
दारू पिणाराला बेवडा दारूडा म्हणनारा विरोधात अब्रु नुकसानीची खटले दाखल करून सरकारी वकीला मार्फत त्यांचे खटले मोफत शासकीय खर्चाने लढवले जावेत.
🥃 शेवटी महत्वाच..
दारू पिऊन लिव्हर खराब झाले आजारी पडले त्याचे ऊपचार अंत्यविधी शासकीय इतमामात मोफत व्हावेत.
शेवटची मागणी.
🥃 सर्व दारू विक्रेत्यांना सन्मानीय ही पदवी देवून वेगवेगळे पुरस्कार श्रेणीत भरीव सामाजिक योगदान म्हणून यांना पुरस्कारीत कराव..धन्यवाद..असेच समाजहीताचे व देश हीताचे निर्णय आपण वेळोवेळी घ्याल हीच अपेक्षा.”
जय हिंद,प्रशांत ऊषाभानुदास शिताप.युवा क्रांती प्रतिष्ठाण.