वाशीम जिल्ह्याचे नवे पालकमंत्री म्हणून क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती झाली असून त्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून परिपत्रक काढून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची वाशीम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाली होती. परंतु या नियुक्तीमुळे हसन मुश्रीफ हे नाराज असल्याच्या चर्चा सर्वत्र चालू झाल्या होत्या. असे असताना हसन मुश्रीफ याबाबत स्पष्टीकरण देत म्हणाले होते कि मी नाराज नाही परंतु कोल्हापूर ते वाशीम हे अंतर सुमारे ८०० कि.मी. पेक्षा जास्त असल्या कारणाने प्रवासा साठी अधिक वेळ खर्च होणार आहे. त्यामुळे बराचसा वेळ हा ये जा करण्यात जाईल असे सांगत वाशीम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या जबाबदारी बाबत असमर्थता दर्शविली होती.
त्यानंतर क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांचे वाशीम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी नाव पुढे आले होते. परंतु त्याबाबत अधिकृत घोषणा झालेली नव्हती. त्यामुळे याच अनुषंगाने आज दि. २६ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने राज्य शासनाचे उपसचिव दिलीप देशपांडे यांनी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे. आणि दि.१८.०१.२०२५ यामध्ये अंशत: बदल करून वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून क्रीडा व युवक कल्याण मंत्री, अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री श्री. दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती करण्यात येत आहे असे शासन निर्णय परिपत्रकात म्हटले आहे. व हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे असे देखील नमूद करण्यात आले आहे.क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांची वाशीम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड झाल्याने इंदापूर तालुक्यात कार्यकत्यांनी आनंदोत्सव साजरा करून जल्लोष केला आहे. या नियुक्तीमुळे इंदापूरची अजून एकदा मान उंचावली असल्याची सदभावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली असून क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे. आता वाशीम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासारखी मोठी जबाबदारी मंत्री दत्तात्रय भरणे कशा प्रकारे हाताळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Home Uncategorized आ.दत्तामामांची भरारी..इंदापूरच्या विकासाची पताका आता वाशीममध्ये!आ.भरणेमामांवर वाशीम जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी!