आषाढी एकादशी निमित्त रोटरी क्लब दौंड यांच्या वतीने आरोग्य शिबिर..

प्रतिनिधी : महेश सूर्यवंशी
दौंड, आषाढी एकादशी निमित्त रोटरी क्लब दौंड ,रोटरॅक्ट क्लब ऑफ दौंड काॅलेज,महालक्ष्मी हाॅस्पीटल व श्री विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ ट्रस्ट दौंड संयुक्त विद्यमाने मोफत रक्त तपासणी व रक्तदाब तपासणी शिबिर आयोजित करण्यात केले होते.
या शिबिरामध्ये 1134 लोकांनी लाभ घेतला शिबिर यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. नगरकर साहेब , सचिव रामेश्वर मंत्री, सचिन कोलते ,शेखर शिंदे रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर राजेश दाते, सचिव अमीर शेख, प्रफुल भंडारी, प्रमोद खांगल, राकेश अग्रवाल, मेडिकल प्रोजेक्ट डायरेक्टर डॉक्टर डी एस लोणकर , डॉ शलाका लोणकर,नितेश पोकार ,हरिभाऊ ठोंबरे,दिपक सोनवणे, प्रमोद पवार ,महालक्ष्मी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल चा सर्व स्टाफ ,रोटरॅक्ट क्लब चे अध्यक्ष प्रेम बनसोडे, महेश जगताप ,हेमांगी बंब ,अक्षदा ठोंबरे पूजा बिडकर व सर्व रोटरी क्लब ऑफ दौंड चे सभासदांनी विशेष सहकार्य केले
आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिर येथे दर्शनासाठी आल्यावर मोफत आरोग्य तपासणी झालेबद्दल भाविकांनी आनंद व्यक्त केला व रोटरी क्लब ऑफ दौंड चे आभार मानले

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here