पुणे: ऊस तोडणी मजूंराकडून फसवणूक झालेल्या ऊस वाहतूकदार शेतकर्यांना आर्थिक मदत मिळावी.तसेच फसवणूक करणार्या ऊस तोडणी मजुरांवर कारवाई करण्यासाठी कायदा करण्याची मागणी महाराष्ट्र ऊस वाहतुकदार संघटनेने साखर आयुक्तांकडे गुरुवारी (दि.८) केली. वाहतूकदारांच्या मागण्यांवर येत्या १५ दिवसांच्या आत निर्णय न झाल्यास उसाच्या वाहनांसह साखर संकुलसमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रशांत रुपनवर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने साखर आयुक्तालयातील सह संचालक (प्रशासन) मंगेश तिटकारे यांना मागण्यांबाबतचे निवेदन देऊन चर्चा केली. यावेळी गणेश आखाडे, जयकुमार जैन, ज्योतीराम चव्हाण, कैलास पवार यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.प्रशांत रूपनवार म्हणाले, ऊस वाहतूकदार हा शेतकरी असून शेतीला पुरक व्यवसाय म्हणून ऊस वाहतूक व्यवसाय करीत आहे. शेतकर्यांच्या शेतातून ऊस वाहून कारखान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम तो करतो. ऊस तोडणीसाठी ऊस वाहतुकदार हे ऊस तोडणीच्या हंगामामध्ये ऊस तोडणीसाठी मजूर यावेत म्हणून अगोदरच आगाऊ रक्कम देवून ऊस मजूर ठरवतो. त्यासाठी स्वतःकडील व खाजगी सावकारांकडून कर्ज घेऊन तो मजुरांना उचल देतो. मात्र, लाखो रुपये घेवूनही मजूर ऊस तोडीसाठी न आल्यास ऊस वाहतूकदारांची फसवणूक होते.आर्थिक फसवणूक झालेल्या ऊस वाहतूकदार शेतकर्यांना आर्थिक मदत करा. ऊस वाहतूकदार शेतकर्यांची फसवणूक करणार्या ऊसतोड मजुरांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना पोलिसांना द्याव्यात. यापुढे ऊस वाहतूकदारांना ऊस तोड मजूरांचा पुरवठा हा कारखान्यांनी अथवा गोपीनाथ मुंडे ऊस तोड महामंडळाकडून करण्यात यावा. गुर्हाळघरांचीही अशीच फसवणूक झाली असून त्यांनाही आर्थिक मदत मिळावी आदींसह अन्य मागण्या संघटनेकडून करण्यात आल्या.
Home Uncategorized आर्थिक फसवणूक झालेल्या ऊस वाहतूकदार शेतकर्यांना आर्थिक मदत करा- महाराष्ट्र ऊस वाहतुकदार...