आरोग्य संदेश बहुद्देशीय समाजसेवी प्रतिष्ठान इंदापूर आयोजित किल्ला बनवा स्पर्धेत सोहम ,ओम ,शुभम व शिवम ननवरे यांना सन्मानपत्र प्राप्त.

दिनांक १६ नोव्हेंबर २०२१ रोजी आरोग्य संदेश बहुद्देशीय समाजसेवी प्रतिष्ठान इंदापूर आयोजित किल्ला बनवा स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा इंदापूर येथे पार पडला.स्पर्धकांनी बनवलेल्या किल्ल्यांचा फोटो व छोटा व्हिडीओ बनवून आयोजकांकडे पाठवले होते ते पाहून परीक्षकांनी गटनिहाय निकाल तयार केला व तो निकाल आज घोषित करून विजयी मुलांचा, पालकांचा व गुरुजनांचा यथोचित सन्मान केला.सन्मानाचे स्वरूप ट्रॉफी,सन्मानपत्र,पुस्तक व गुलाबपुष्प असे होते.प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवव्याख्याते गणेश धालपे यांचे सुश्राव्य असे व्याख्यान पार पडले व त्यांच्या व मान्यवरांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण पार पडले.यावेळी व्याख्याते गणेश धालपे,डॉ संदेश शहा,तुषार रंजनकर,गटकूळ सर,जमीर शेख,शिक्षक,स्पर्धक,पालक उपस्थित होते.सदर कार्यक्रम अल्फा बाईट इंदापूर सभागृह येथे कोरोनाचे नियम पाळून पार पडला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here