आरोग्य, शिक्षण, पर्यावरण यासारख्या विषयांवर सार्वजनिक गणेश मंडळांनी भर देऊन जनजागृती करावी- आमदार दत्तामामा भरणे.

“सुरू झाला गाजावाजा नाचत येणार बाप्पा माझा,
दहा दिवस नुसतीच मजा कारण घरी येणार गणेशराजा..”
आज घरोघरी आणि शहरातील विविध भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपतीची प्रतिष्ठापना होणार आहे. गणेशोत्सवामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने इंदापूर तालुक्यातील विविध सार्वजनिक मंडळात देखावे निर्माण केले जात असून, घरोघरी गणपतींचे स्वागत केले जात आहे.महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाच्या कृपेने गेल्या दोन वर्षातले कोरोना संकट आता दूर झाले आहे. त्यामुळे यंदा आपण गणरायाचे उत्साहात, जल्लोषात आणि निर्बंधमुक्त वातावरणात स्वागत करत आहोत. गणरायाचे आगमन आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येवो या शब्दांत माजी राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांनी तालुक्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पुढे भरणेमामा गणेशोत्सव मंडळास शुभेच्छा संदेशात म्हणाले की “उत्सव साजरा करताना सामाजिक भान जपणं देखील आवश्यक आहे. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण यासारख्या विषयांवर सार्वजनिक गणेश मंडळांनी भर देऊन जनजागृती करावी असे आवाहनही यावेळी आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here