मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन
मुंबई||(प्रतिनिधी:वैभव पाटील) समाजातील उपेक्षित लोकांना सेवा देत असताना समुदाय आरोग्य अधिकार्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.या अडचणी सोडविण्यासाठी आणि काही महत्त्वाच्या मागण्यांसाठीची बैठक महाराष्ट्र समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या पदाधिकार्यांसोबत महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेब यांच्या मुंबई येथील मंत्रालयातील दालनात त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली या बैठकीस आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव मा.श्री.डॉ.प्रदीप व्यास,आरोग्यसेवेचे आयुक्त मा.श्री.डॉ.रामास्वामी सर आरोग्यसेवेचे अतिरिक्त महासंचालक मा.श्री.डॉ.सतीश पवार,राष्ट्रीय आरोग्य अभियानचे मा.श्री.डॉ.विजय कांदेवाड उपस्थित होते.
महाराष्ट्रामधे आरोग्य विभागाच्यावतीने राष्ट्रीय ग्रामीण स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आरोग्यावर्धिनी केंद्रांच्या माध्यमातून तळागाळातील गोरगरीब आणि उपेक्षित नागरिकांपर्यंत सक्षम आरोग्यासेवा पुरविण्याचे काम सुरु आहे.
या आरोग्यवर्धिनी केंद्रांमधे गेल्या चार वर्षांपासून कार्यरत असणारे समुदाय आरोग्य अधिकारी ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना तळागाळापर्यंत अतिशय प्रामाणिकपणे आरोग्य सेवा पुरवित आहेत.आपल्या कामाच्या जोरावर समुदाय आरोग्य अधिकार्यांनी आपल्या कामाच्या जोरावर महाराष्ट्राच्या आरोग्य विभागामधे आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे.
यावेळी आरोग्यमंत्र्यांनी विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा केली.तसेच यामधील काही मागण्या मान्य केल्या आणि यावर लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.तसेच काही मुद्दे हे वरिष्ठांशी चर्चा करुन त्यावरती सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
सदर बैठकीस महाराष्ट्र समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ.अमोल रावते,राज्यकार्याध्यक्ष डॉ.संग्राम शिंदे,राज्य महासचिव अश्रफ अली शेख,कोल्हापूर जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत भोसले,उपाध्यक्ष शीतलकुमार आरगे,पालघर जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित महाजन,रायगड जिल्हाध्यक्ष डॉ.रुपेश सोनावडे,जळगाव जिल्हा समन्वयक डॉ. साजीद तडवी,जळगाव जिल्हा महिला प्रतिनिधी डॉ.प्रिया बोंबटकर,डॉ.राहुल गजरे जळगाव,डॉ.गुंजन गाजरे जळगाव,श्री.रुपेश भोईर पालघर उपस्थित होते.सदर बैठक महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री एकनाथरावजी खडसे साहेब यांनी आयोजित केली होती.