इंदापूर: इंदापूर तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) गटाच्या कार्यकारणी मध्ये तालुकाध्यक्षपदी शिवराज पवार तर शहराध्यक्षपदी अशोक भाऊ देवकर यांची नुकतीच एकमताने निवड करण्यात आली .
इंदापूर तालुक्यातील व ग्रामीण भागातील युवकांचे संघटन करून प्रामाणिकपणे सतत अग्रेसर राहणारे शिवराज पवार व इंदापूर शहरामध्ये सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन जाणारे व न्याय हक्कासाठी लढणारे अशोकभाऊ देवकर यांची निवड झाल्याने युवक वर्गासह व्यापारी व ज्येष्ठ नागरिक यांच्यामध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले याच प्रित्यर्थ आज शिवराजदादा पवार यांची व अशोक(भाऊ) देवकर यांची निवड झालेबद्दल सत्कार इंदापुर शहर अध्यक्ष भारतीय जैन संघटना श्रीमान धरमचंदजी लोढा यांचेकडुन करण्यात आला. यावेळी श्रीमान धरमचंद लोढा म्हणाले की मिळालेल्या पदाचा वापर सर्वसामान्य व्यक्ती ,शेतकरी व व्यापारी यांच्या हितासाठी करावा व नूतन तालुका अध्यक्ष व शहराध्यक्ष हे आपल्या मिळालेल्या पदास न्याय देतील असा विश्वास आहे असे मत धरमचंद लोढा यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
याप्रसंगी अध्यक्ष कामशेत NCP वार्ड क्र.2 सन्माननिय बाळुमामा धाडिवाल,विकास खिलारे (विशेष कार्यकारी अधिकारी इंदापुर), देविदास वीर,बाळासाहेब क्षीरसागर उपाध्यक्ष युवा क्रांती प्रतिष्ठान गणेश जाधव,शुभम सातपुते,अविनाश जाधव,नवनाथ कातकडे,अमोल मांढरे ईतर मान्यवर उपस्थित होते.