करमाळा:पंचायत समितीच्या झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये विद्यमान सदस्यांना हादरे बसवणारे आरक्षण जाहीर झाले आहे. मागील पंचवार्षिक मध्ये एकाच पक्षातील तीन सभापतींना संधी मिळाली होती. परंतु आरक्षणामुळे एकालाही उभे राहण्याची संधी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे त्या तिघांनाही एक तर महिलांना संधी द्यावी लागेल किंवा वेगळ्या गणात उभे राहावे लागेल. सभापतीसह इतर काही सदस्यांनाही आपल्या जागा गमवाव्या लागत आहेत. तर काही ठिकाणी आरक्षण उठल्याने आनंद व्यक्त होत आहे काही ठिकाणी आरक्षण तुल्यबळ यांना धक्का बसला आहे. पंचायत समितीचे आरक्षण सोडत गुरुवारी सकाळी अकरा वाजता पंचायत हॉलमध्ये पार पडली यावेळी बारा जागा ही सोडत करण्यात आली. इयत्ता तिसरीचा विद्यार्थी वेदांत घुगे यांच्या हस्ते चिठ्ठ्या उधळून आरक्षण जाहीर करण्यात आले. बारा पैकी दोन अनुसूचित व तीन नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तर बारा पैकी सहा महिलांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. यावेळी नियंत्रण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड, तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी मनोज राऊत, यांच्यासह देवानंद बागल संतोष वारे अशोक सरडे राजू कांबळे उदय ढेरे चंद्रकांत सरडे ठाकूर अंगद देवकते यांसह सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. माजी सभापती शेखर गाडे यांचा गण मागील वेळी अनुसूचित जातीसाठी राखीव होता परंतु यावेळी ना मा प्र महिला आरक्षण पडले आहे. सभापती गहिनीनाथ ननवरे गणातही नामाप्र महिला आरक्षण त्याने यांचीही संधी हुकली तर माजी सभापती अतुल पाटील यांचा गण सध्या नव्या गणात विलीन होऊन त्या ठिकाणी ना मा प्र आरक्षण पडल्याने त्या तीनही सभापतींचे आरक्षण हुकले आहे.शिवाय पांडे गटात ॲड.राहुल सावंत विद्यमान सदस्य होते.पण यंदा खुल्या प्रवर्गातील महिलेला आरक्ष्यन पडल्याने त्यांना त्या ठिकाणी उभे राहता येणार नाही.चिकलठाणा येथे सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्याने विद्यमान सदस्य दत्तात्रय सरडे यांच्या अडचणी तर वाढल्याच आहेत,पण तुळ्य बळ असे शिंदे गटाचे सरडे यांचा भ्रमनिरास झाला आहे. उमरड येथे शिंदे गटाचे बदे परिवारातील नेते आरक्षणाकडे डोळे लाऊन होते,त्यांनाही अनुसूचित आर क्षण पडल्याने उभे राहता येणार नाही.तर दुसरीकडे जेऊर इथे ना मा प्र आरक्षण पडल्याने माझी आमदार नारायण पाटील यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे.तसेच साडे सारख्या गावात वजन असणारे शिंदे गटाचे दत्तात्रय जाधव यांना मात्र सर्वसाधारण जागा असल्याने त्या भागात त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला.मागील वेळी दत्तात्रय जाधव यांच्या पत्नी सदस्य होत्या.
आरक्षण सोडत खालील पद्धतीने :-
रावगाव -सर्वसाधारण,पांडे सर्वसाधारण(महिला),हिसरे सर्वसाधारण, वीट – ना. मा. प्र.(महिला),
कोर्टी – सर्वसाधारण (महिला), चिकलठाण – सर्वसाधारण (महिला), उमरड – अनुसूचित जाती (महिला),
जेऊर – ना. मा प्र.वांगी – अनुसूचित जाती, साडे – सर्वसाधारण, केम- ना.मा.प्र.(महिला).