गरुड फाउंडेशन महाराष्ट्र व युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र यांच्या वतीने राहुरी कृषी विद्यापीठ येथे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
इंदापूर: कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, इंदापूर येथील इंग्रजी विषयाचे शिक्षक श्री.राजीव शिरसट(सर) यांना नामांकित गरुड फाउंडेशन महाराष्ट्र व युवा ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्रातील वैद्यकीय, प्रशासकीय,सहकार, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, कृषी, पत्रकारिता,आरोग्य, पर्यावरण, क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय व समाज हिताचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्रातील नामांकित पुरस्कारांपैकी समजला जाणारा पुरस्कार दिला जातो. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे आयोजित अहिल्यानगरचे खासदार श्री.निलेश लंके, माजी मंत्री श्री. प्राजक्त तनपुरे, श्री.रावसाहेब खेवरे, पोलीस आयुक्त श्री.संदीप भांड, तहसीलदार श्री.नामदेव पाटील, पोलीस निरीक्षक श्री.संजय ठेंगे, श्री.रमेश खेमनर, पत्रकार जावेद शेख यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आला. राजीव शिरसट यांनी ग्रामीण भागात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान आहे. ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमांतून गरुजू विद्यार्थ्यांना नवोपक्रमाच्या साह्याने अध्ययन निष्पत्ती देण्याचे पवित्र काम केले गेले.राजीव शिरसट यांनी ऑनलाईन पद्धतीचा अध्यापनात प्रभावी वापर, इनोव्हेटिव्ह इंग्लिश टिचींग, पॉवरफुल इम्पॅक्ट ऑन स्टूडेंट करिअर, AI टूल्स चा इंग्रजी अध्यापनात वापर, सोशल मीडियाचा अशा ऑनलाईन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक ग्रामीण विद्यार्थ्यासाठी उपक्रम यशस्वीपणे राबवले. विद्यार्थी हीत डोळ्यासमोर ठेवून राजीव शिरसट यांनी तळमळीने काम केले यामुळे त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री श्री.हर्षवर्धनजी पाटीलसाहेब, मा.राजवर्धनदादा पाटील, सचिव श्री.मनोहर चौधरी साहेब, सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जीवन सरवदे, उपप्राचार्य प्रा.दत्तात्रय गोळे सर, आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. तसेच शिक्षक भारती संघटना पुणे विभाग व निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य आदी संघटना पदाधिकारी, सदस्य यांनी श्री.राजीव शिरसट यांचे अभिनंदन केले.