वैभव पाटील :प्रतिनिधी
सालाबाद्रमाणे आधार प्रतिष्ठान बोईसर आणि श्रमिक संघटना महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर जिल्ह्यातील आदिवासी व आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय समाजातील २०१ वधू वरांचा भव्य सामुदायिक विवाह सोहळा गुरुवार दिनांक २६ मे २०२२ रोजी आयोजित केला होता, सदर कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ, खासदार राजेंद्र गावित, पंचायत समिती सभापती रंजना म्हसकर, आमदार श्रीनिवास वनगा, आमदार राजेश पाटील, आमदार मुजफ्फर हुसैन, केतन काका पाटील, अजय ठाकूर, ज्योती मेहेर, युवासेना पालघर जिल्हा विस्तारक आशिष पाटील, तसेच युवासेना पदाधिकारी दीपक मोरे, नचिकेत पाटील, वंदेश पाटील, बिपिन बारी यांनी उपस्थित राहून नव दांपत्यास शुभाशीर्वाद दिले.सदर कार्यक्रमाचे हे ८ वे वर्ष असून आधार प्रतिष्ठान बोईसर आणि श्रमिक संघटना महाराष्ट्र यांच्या मार्फत आतापर्यंत सुमारे ४००० वधू वरांचे विवाह संपन्न झाले आहेत.
सदर कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी आधार प्रतिष्ठान चे अध्यक्ष महेंद्र सिंग, आधार प्रतिष्ठान सचिव/ श्रमिक संघटनेचे संस्थापक / उपजिल्हाप्रमुख शिवसेना / मा. उपाध्यक्ष कोकण पाटबंधारे जगदिश धोडी, तसेच युवासेना उपजिल्हा युवा अधिकारी आनंद धोडी यांच्यावर होती.