इंदापूर: भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या 190 व्या पुण्यतिथीनिमित्त कौठळी ता. इंदापूर येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी तरुण पिढीने आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांचे कार्य अंगीकारावे असे मत व्यक्त केले.
यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की ,’ धैर्य कशाला म्हणायचे हे त्यांच्या कर्तृत्वाने सिद्ध होते. धाडसीपणाने आक्रमण कसे करावे तसेच अन्याय करणाऱ्याच्या विरोधामध्ये माझा प्राण गेला तरी चालेल पण तो अन्याय मोडून काढणार ही शिकवण आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांच्याकडून आपल्याला मिळते.
काल कौठळी गावामध्ये उदघाटन कार्यक्रमांमध्ये जो अडथळा निर्माण केला त्याचा मी निषेध व्यक्त करतो. गावाच्या विकासाकरिता कोणीही पैसे आणले तरी गाव महत्त्वाचे आहे विकास महत्त्वाचा आहे. या परिसराचा विकास आपल्या कालखंडात झाला.जो काम करतो त्याला सांगायची गरज नाही.
यावेळी प्रकाश काळेल,साहेबराव पिसाळ,नाथा माने, रामभाऊ जाधव, रमेश भंडलकर, नानासाहेब भंडलकर, किरण माने, चंदुलाल भंडलकर, सोमनाथ पिसाळ, स्वप्निल काळे उपस्थित होते.