वैभव पाटील :पालघर जिल्हा प्रतिनिधी.
दि. 2 ऑक्टोबर:विश्रामपूर गावचे ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते व माजी पोलीस पाटील कै श्री. भालचंद्र पांडुरंग पाटील यांचे मंगळवार दि.01 /11/2022 रोजी सायंकाळी सहा वाजता वयाच्या 87 व्या वर्षी दुःखद निधन झाले.
ते 40 वर्षे विश्रामपूर गावचे पोलीस पाटील होते .अत्यंत प्रेमळ व मनमिळावू व पंचक्रोशी मध्ये आदर्श शेतकरी तसेंच प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती.बुधवार दि.02 /11/2022 रोजी सकाळी 10 वाजता त्यांच्या पार्थिवावर विश्रामपूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व समाज बांधव मित्रपरिवार नातेवाई मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यांच्या पश्चात तीन मुलगे एक मुलगी तीन भाऊ नातवंडे असा मोठा परिवार आहे .त्यांचे उत्तरकार्य शुक्रवार दि.11/11/2022 रोजी राहत्या घरी करण्यात येईल.
Home Uncategorized आदर्श शेतकरी तथा प्रतिष्ठित व्यक्तिमत्व विश्रामपूर गावचे माजी पोलीस पाटील यांचे निधन.