इंदापूर:महाराष्ट्रामध्ये सर्वात जादा निधी आणण्याच्या यादीमध्ये दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या आमदार दत्तात्रय भरणे यांना आता आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे का? असा प्रश्न तालुक्यातील कार्यकर्त्यांना वाटू लागला आहे. हजारो कोटींचा निधी आणत गावागावांना तसेच खेडोपाडी व वाड्यावस्त्या जोडण्याचे काम आ.भरणे यांनी केले आहे.असे असताना इंदापूर शहरात मात्र चित्र वेगळेच पाहायला मिळते आहे.महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचा अजित पवार गट भाजपा सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली बैठक इंदापूर येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात होती या सभेला कार्यकर्त्यांची गर्दी होती परंतु इंदापूर शहरातील एकही नगरसेवक या बैठकीला उपस्थित नव्हते हे अधोरेखित झाले.यानंतर शहरात उलट सुलट चर्चा चालू झाल्या होत्या आणि त्याच्या पुढच्याच आठवड्यात आमदार भरणे एका हॉटेलच्या उद्घाटनसाठी आले होते त्यावेळीही ठराविक, नेहमीचे व मोजके कार्यकर्ते सोडले तर या कार्यक्रमासही एकही नगरसेवक उपस्थित नव्हते.सर्वात महत्त्वाचे म्हणजे दोनच दिवसांपूर्वी मोहरमच्या निमित्ताने आमदार दत्तात्रय भरणे यांचे पुन्हा इंदापूरमध्ये आगमन झाले त्यावेळी आमदार भरणे हे दुचाकीवरून गल्लोगल्ली फिरत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देताना पाहायला मिळाले.परंतु यावेळी देखील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी त्या कार्यक्रमाला पाठ फिरवत दांडी मारणे पसंत केले.शहरात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या सत्ताधिकारी नगरसेवकांपेक्षा ज्यादा आहे परंतु अशा परिस्थिती ही कोट्यावधी रुपये निधी आणत शहराचा चेहरा मोहरा बदलणारे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या कार्यक्रमाला मात्र नगरसेवक का येत नाहीत याची उलट सुलट चर्चा पुन्हा चालू झाली आहे.सदरच्या नाराज नगरसेवकांचा फायदा जर भाजपाला झाला तर याचा थेट फटका राष्ट्रवादी काँग्रेस सह भरणे यांना बसेल असे चिन्ह आहेत सध्या इंदापूर तालुक्यात भरणे विरुद्ध पाटील सत्तासंघर्ष हा अतितटीचा बनला आहे.अशात इंदापूर नगरसेवकांची नाराजी आमदार भरणेना मात्र चिंतादायक करणारी ठरत आहे. त्यामुळे आमदार दत्तात्रय भरणे यांना आत्मचिंतन करण्याची गरज आणि वेळ आहे.