पाटस – जगतगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा पूर्व तयारी स्वच्छता लाईट , पाणी, आदी सुविधा केलेली आहे . उदया पालखी दि. 26 जून रोजी वरखंड या गावातून पहिला विसावा पाटस येथे घेतला जातो पालखी सोहळा नागेश्वर मंदिरात विसाव्या साठी थांबवली जाते प्रथेप्रमाणे पादुका पूजन व आरती स्थानिकांच्या हस्ते करण्यात येणार असून दुसऱ्या विसाव्यासाठी पालखी रोटी, हिंगणगाडा, वासुंदे यामार्गी मार्गस्थ होणार आहे. उंडवडी या गावी रात्री मुक्कामांसाठी थाबणार आहे यासाठी अनेक कंपन्या संस्था, गावकरी, सरपंच, उपसंरपच ग्रामपंचायत आजी माझी सदस्य , कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने मदत करणार असल्याचे सांगितले आहे. सकाळी12 वाजता पालखीची आरती घेऊन पाटस गावातून पुढील गावी मार्गस्थ होणार आहे.