…आणि अखेर प्रशासन झुकले ॲड.राहुल मखरे यांच्या आमरण उपोषणाला यश…

इंदापूर (प्रतिनिधी):-दि.६ डिसेंबर रोजी अनुकंप तत्त्वानुसार वारस अधिकाराच्या पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्यात यावी तसेच बोगस मतदारांना वगळण्यात यावे व वरकुटे खुर्द येथील कागदपत्रे गायब करणाऱ्या तत्कालीन ग्रामसेवक व जबाबदार व्यक्तींच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून दोन दिवस सुरू असलेल्या अमरण उपोषण यश आले आहे.दि. ७ डिसेंबर २०२१ रोजी रात्री ०९:३० मिं उपोषणा वेळी ज्या मागण्या होत्या त्या सर्व मागण्या मान्य करण्यात आले आहेत.
अनुकंपा नुसार पात्र वारस उमेदवारांची नियुक्ती प्रक्रिया १५ दिवसात सुरू करण्यात येईल.जर अनुकंपानुसार मान्यता मिळाली तर प्रतीक्षा यादी नुसार नियुक्त्या देण्यात येतील व वारसा हक्कानुसार मान्यता मिळाली तर १५ दिवसात चारही उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल असे लिखित आश्वासन देण्यात आले आहे.
तसेच बोगस/ स्थलांतरीत / दुबार / मयत मतदारांना वगळण्याचे कामकाज युद्धपातळीवर सुरु आहे ,अशा जवळपास २५०० मतदारांची यादी तयार करण्यात आली आहे.त्यांची स्थळपहाणी , पंचनामे तयार केले आहेत.यांना वगळण्यात येणार आहे व त्यातूनही कोणी चुकून राहीले व दोन ठिकाणी मतदान करत असल्याचे आढळून आले तर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.त्यासाठी अशा संशयित मतदारांची वेगळी सूची तयार करण्यात येईल असे ही सांगण्यात आले आहे.
त्याचबरोबर वरकुटे (खुर्द) येथील दोषींवर कारवाई करण्याचा अहवाल मुख्याधिकारी जिल्हा परिषद पुणे यांना पाठविण्यात येत आहे असे लिखित आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलनाची यशस्वी सांगता करण्यात आली.
यावेळी इंदापूर चे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या पुढाकाराने सांयकाळी ०५:०० वाजलेपासून रात्री ०९:३० पर्यंत प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्यात आली.या चर्चेत पंचायत समितीच्या वतीने गटविकास अधिकारी विजयकुमार परीट , नगरपालिकेच्या वतीने मुख्याधिकारी रामराजे कापरे व नगरसेवक भरतशेठ शहा यांनी सहभाग घेतला होता.तहसीलदार यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे व त्यांच्यावर असलेला विश्वास यामुळे उपोषण स्थगित करण्यात येत आहे असे उपोषणकर्ते ॲड राहुल मखरे यांनी सांगितले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here