आज सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन डॉ. कदम गुरुकुल मध्ये उत्साहात साजरा.

आरोग्य संदेश बहुउद्देशीय समाजसेवी प्रतिष्ठान इंदापूर आणि क्रेडाई इंदापूर यांच्यावतीने सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिनाच्या निमित्ताने डॉ.कदम गुरुकुल मधील छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी झालेल्या राज्यस्तरीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धा 14 वर्ष वयोगट मुले आणि मुली दोन्ही संघातील विजयी खेळाडू, मुले – शिवराज पांडुरंग शेरकर, तेज तानाजी कचरे, यश सुरेश शिंदे, वेदांत ज्ञानेश्वर देवकर, वेदांत लक्ष्मण सपकाळ, ओम बालाजी अडसुळे, यश सूर्यकांत साळुंखे, राजीव देवराज दुधाळ, रोहन राहुल पारेकर, अक्षय दादासाहेब खाडे, प्रेम पियुष बोरा, आर्यन सचिन बदादे, साकिब मेहमूद सय्यद, संजीत अभिजीत यादव, धनराज सोमनाथ काळे, मुली – आर्या विकास चव्हाण,प्रगती संदीप जगताप,स्वरा तुषार गुजर,अस्मि नितीन राऊत,प्राची सतीश कोरे, ऋतुजा सोनबा गिरी, तनया सचिन पवार, आद्या सचिन बिचकुले,यज्ञा अभिजीत पाटील, आर्या अमित दुबे, तरुनम वसीम शेख, नंदिनी हरिश्चंद्र गोळे, तनिष्का प्रदीप आवटे-पाटील, मेहेक विपुल लोढा,अनुष्का बापू शिंदे, प्रशिक्षक सोमनाथ नलवडे, शुभदा राऊत आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान आरोग्य संदेश बहुउद्देशीय समाजसेवी प्रतिष्ठान इंदापूर आणि क्रेडाई इंदापूर यांच्यावतीने करण्यात आला.यावेळी क्रेडाई इंदापूर चे अध्यक्ष संजय भोंग, आरोग्य संदेश बहुउद्देशीय समाजसेवी प्रतिष्ठान इंदापूरचे अध्यक्ष डॉ. संदेश शहा,सचिव जमीर शेख,वसंतराव माळुंजकर संस्थापक अध्यक्ष क्रेडाई,विशाल दादा बोंद्रे डायरेक्टर क्रेडाई यांनी सावित्रीबाई फुले यांचे कार्य सांगितले. तसेच डॉ. कदम गुरुकुल मध्ये आयोजित केलेल्या क्रीडा महोत्सवाचा आज दुसरा दिवस हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन डॉ. संदेश शहा आणि वसंतराव माळुंजकर यांच्या शुभहस्ते करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी डॉ. कदम गुरुकुल च्या शैक्षणिक संचालिका डॉ.सविता कदम,प्राचार्य वृंदा मुलतानी जोशी,उपप्राचार्य ऋषी बासू, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्कूल मॅनेजर संदीप जगताप यांनी केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here