इंदापूर तालुक्यातील माळी समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी दि.२६ मार्चला निमगाव केतकी येथील संत सावतामाळी मंदिरात सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत समाजावरील होणारे अन्याय दूर करण्याच्या हेतूने व माळी समाज बांधवांच्या विकासासाठी तालुक्यातील सर्व माळी समाज एकत्र आला पाहिजे.यासाठीच इंदापूर तालुका माळी परिषदेची स्थापना करण्यात येणार आहे.इंदापूर तालुका माळी परिषद कार्यकारणी निवडणे, समाज संघटन वाढविण्यासाठी उपाययोजना करणे.समाज्याला भेडसावणाऱ्या अडचणी सोडवणे अशा अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात येणार आहे.तरी इंदापूर तालुक्यातील जास्तीत जास्त माळी समाज बांधवांनी, विविध माळी समाज संघटनेतील पदाधिकार्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.