इंदापूर: इंदापूर तालुक्यातील महत्त्वाची ग्रामपंचायत समजली जाणाऱ्या शेळगाव व परिसरातील वाड्यावस्त्यांसाठी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून तब्बल 51 कोटी 55 लाख रुपयाच्या कामांची भूमिपूजन व उद्घाटन समारंभ आज शेळगाव येथे होणार आहे.
आज होणाऱ्या 51 कोटी 55 लाख रुपयाच्या विविध विकास कामांमध्ये प्रामुख्याने ग्रामपंचायत शेळगाव अंतर्गत तब्बल 49 कोटी 30 लाख रुपये जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेसाठी मंजूर झालेले आहेत या कामाचे भूमिपूजनही आज खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होणार आहे. त्याचप्रमाणे मौजे शेळगांव येथे नागरी सुविधा अंतर्गत सन २०२१-२२ रस्ते, बंदीस्तगटर, हायमास्ट रक्कम रू. ८६ लक्ष रू. सन २२-२३ ५४ लक्ष आमदार निधी वैदवाडी बंदिस्त गटर २० लक्ष | ३०५४ महादेव नगर रस्ता २५ लक्ष, २५१५ महादेवनगर रस्ता १५ लक्ष अल्पसंख्यांक कब्रस्तान अंतर्गत रस्ता १० लक्ष, तीर्थक्षेत्र विकास २५ लक्ष या सर्व कामांचे प्रामुख्याने आज भूमिपूजन व उद्घाटन होणार आहे.
आज होणाऱ्या या समारंभामध्ये मोहोळचे आमदार यशवंत तात्या माने व राष्ट्रवादीचे जिल्हाप्रमुख प्रदीप दादा गारटकर यांच्यासह प्रताप पाटील,श्रीमंत ढोले,प्रविणभैय्या माने,प्रशांतबापू पाटील,हनुमंत कोकाटे,वैशालीताई पाटील,अमोल पाटील,अँड. लक्ष्मणराव शिंगाडे ,सचिन सपकळ,नारायणआण्णा खराडे,शुभम निंबाळकर,बापुराव शेंडे,छायाताई पडसळकर,बाळासो शिंदे,बाळासाहेब करगळ,अभिजीत रणवरे,गणेशआण्णा झगड़े, दशरथ डोंगरे, हामा पाटील,सागर मिसाळ,अतुल झगड़े,शशिकांत तरंगे,भजनदास पवार, भाऊसाहेब सपकळ, तेजसिंह पाटील,विरसिंह रणसिंग, राजु भोसले,तात्यासो वडापुरे,योगेश माने,नंदकुमार रणवरे,संजय चव्हाण,दादासो जाधव,सचिन खामगळ इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
Home Uncategorized आज खा.सुप्रिया सुळे यांच्या हस्ते व आ.दत्तात्रय भरणे अध्यक्षतेखाली होणार तब्बल 51...