इंदापूर तालुक्यात उसाची सरासरी उत्पादकता साधारण एकरी ४५ ते ५० टन इतकी आहे. उसाचे प्रति एकरी १०० टन ऊस उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज ओळखून ओंकार ॲग्रोटेक( यशवंत इंगळे) यांनी जैन इरिगेशन सिस्टिम्स लि .जळगाव यांच्यामार्फत शेतकऱ्यांसाठी बहुमूल्य असे ऊसपिक परिसंवाद या कार्यक्रमाचे आयोजन अवसरी मध्ये केले आहे. ऊस म्हणजे उत्पादनाची किमान हमी देणारे पीक म्हणून आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय.. उत्तम नियोजन, योग्य अंतर व आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर सुरू व पूर्व हंगामी तसेच खोडवा उसाचे एकरी ८० ते १०० टनाचे लक्ष ठेवून तसेच ऊस पिकातील रासायनिक खताचे नियोजन, विद्राव्य खतांचा वापर, कीड रोग व तन नियंत्रण, माती परीक्षण या सर्व गोष्टींवर मार्गदर्शन करण्यासाठी जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.चे डॉ. विजय माळी( वरिष्ठ ऊस पिक शास्त्रज्ञ) श्री रवी गाडीवान( विभागीय सरव्यवस्थापक) श्री विनोद पाटील( क्षेत्रिय व्यवस्थापक) श्री तुषार जाधव( ॲग्रोनॉमीस्ट) हे सर्व अभ्यासक या ऊसपिक परिसंवादास शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार असून तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आज दि.७ जानेवारी २०२३ रोजी संध्याकाळी ६ वाजता हनुमान मंदिर अवसरी या ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक ओंकार ॲग्रोटेक चे मालक यशवंत इंगळे यांनी जनता एक्सप्रेस मराठी न्यूज मार्फत सर्व शेतकरी बांधवांना केले आहे.