आजही माणुसकी जिवंत आहे.. व्हाट्सअप ग्रुपचा सेवानिवृत्त मेजर यांना असाही एक फायदा..

दि. २९/०१/२०२३ रोजी सेवानिवृत्त मेजर अनिल नारायण माने व त्यांची पत्नी हे दोघे दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान हाॅस्पिटलकडे जात असताना इंदापूर शहरातील (पंधारानाला) नजीक असलेले रास्तभाव दुकानदार श्री. राजेंद्र पांडूरंग जगताप यांच्या दुकानसमोर त्यांची पर्स पडली त्यावेळी दुकानासमोरच रेशन धान्य घेण्यास आलेले प्रसाद माने त्यांचे लक्ष त्या पर्स कडे गेले त्यावेळी ती पर्स प्रसाद माने यांनी उचलून राजेंद्र जगताप यांच्याकडे आणली असता ती पर्स कोणाची असावी ती पर्स खोलून बघावी का असा विचार राजेंद्र जगताप व प्रसाद माने करू लागले त्यावेळी आणखीन कोणीतरी बरोबर असावे म्हणून शेजारीच दुकानातील गॅरेज काम करणारा महेंद्र सोनवणे यांना त्यांनी बोलावले आणि जमलेले सर्व लोकांसमोर ती पर्स उघडली असता त्या पर्समध्ये काही पैसे, डेबीट कार्ड व कागदपत्रे आढळून आल्याने त्यांनी डेबीट कार्डचा आधार घेऊन संध्याकाळी इंदापूर शहरातील “विचार मंथन” नांवाच्या ग्रुपचे प्रमुख प्रकाश पवार यांच्याशी संपर्क साधला व विचार मंथन या ग्रुपवर पर्स कोणाची हारवली आहे का..? या संदर्भामध्ये पोष्ट टाकली असता काही मिनिटातचं त्या पर्सच्या मालकाचा शोध लागला त्यांनी त्या पर्सच्या मालकाला खानाखुना विचारुन खात्री केली आणि मगचं ती पर्स राजेंद्र जगताप , प्रसाद माने व महेंद्र सोनवणे यांनी साथी सलीम शेख, अशोकराव पोळ, विजय इंगुले, विचार मंथनचे प्रमुख प्रकाश पवार यांच्या उपस्थितीमध्ये मेजर अनिल माने यांच्याकडेस सुपुर्त करण्यात आली. यावेळी मेजर अनिल माने म्हणाले कि “आजपर्यत मी देशाची सेवा हि प्रामाणिकपणे केली आहे.ही पर्स हारवली आहे ती सापडणार नाही असे आम्ही गृहीत धरले होते परंतु विचार मंथन सारख्या ग्रुपवर मॅसेज पडताचं आम्हाला आमची हारवलेली पर्स सापडली त्यामुळे आज खऱ्या अर्थाने माणुसकी जीवंत असण्याचा प्रत्त्यय आल्याने आम्ही राजेंद्र जगताप, प्रसाद माने आणि विचार मंथन परिवाराचे आभार मानतो अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here