आघाडी सरकारने दिलेला शब्द पाळला नाही.जोगेंद्र कवाडे.,निवडणुक आयोग व केंद्र सरकार यांचे साटेलोटे असुन आगामी काळात होणार्‍या सर्व निवडणुका या इव्हीएम मशिन ऐवजी बॅलेट पेपरवरच व्हाव्यात.

👉 पिपल्स रिपब्लिकन पार्टी आगामी निवडणुका स्वबळावर लढणार.
👉 आगामी काळात समविचारी पक्षाशी युतीचा विचार करणार.
इंदापुर: गढूळ राजकारणातील स्वार्थापोटी येनकेन प्रकारे सत्ता प्राप्त करण्यासाठी आमच्या पक्षाची भुमीका स्वच्छ आणि स्पष्ट आहे.अलीकडचे राजकारण येवढे गढुळ झाले आहे की,राज्यात कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता आनेक प्रकारच्या आघाड्या,युत्या केल्या जात आहेत.परंतु पिपल्स रिपब्लिकन पक्ष सुरूवातीपासुनच काँग्रेस पक्षाच्या आघाडीमध्ये आहे.काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीमुळे आमचा पक्ष देखील आघाडी पक्षाचा मित्र झाला.आम्ही आघाडीचा धर्म पाळला परंतु आघाडी सरकारने त्यांचा धर्म न पाळल्याने पिपल्स रिपब्लिकन पार्टीने आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रिय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी इंदापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगीतले.आघाडीचा धर्म पाळताना पिपल्स रिपब्लिकन पार्टीने काँग्रेस राष्ट्रवादीला जिवापाड साथ दीली.परंतु कालची जी विधानसभा निवडणुक झाली त्यामध्ये शिवसेना भाजपाची युती संपुष्टात आली.आणि जर राज्यात सरकार स्थापन करण्याचा प्रसंग आला तर काँग्रेस व राष्ट्रवादीने आमच्या पक्षासह इतर पक्षाशी आमची बैठक मुंबई येथे झाली.भाजपा सारखा धार्मिक वितंडवाद निर्माण करणारा सांप्रदायीक पक्ष असुन त्याला सत्तेपासुन दुर ठेवण्यासाठी शिवसेनेसोबत एकत्र बसुन सरकार स्थापन करण्याची सुचना केली होती.व शिवसेना,राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाची सत्ता स्थापन झाली.आम्हीही त्यामध्ये मित्रपक्ष म्हणुन सहभागी झालो.परंतु आघाडी सरकारने अद्याप मित्रपक्षाशी आघाडीचा धर्म पाळलेला नाही.
आघाडी सरकारने मित्र पक्षाला सत्तेत उचित वाटा दीला नाही.त्यामुळे भाजपा आणि आघाडी सरकामध्ये काहीच फरक नसल्याचे आमच्या निदर्शनास आले असुन गेल्या दोन वर्षात आम्हाला काहीच फायदा झाला नाही.सत्तेसाठी हपापलेले पक्ष हे स्वार्थासाठी कोणत्याही पक्षाशी युती करत आहेत.आघाडी सरकार तुपाशी व त्यांचे मित्र पक्ष उपाशी अशी स्थिती गेल्या दोन वर्षात आघाडी सरकारने मित्र पक्षाची केल्याने आम्ही नविन समविचारी पक्षाच्या शोधात असुन त्याबाबत लवकरछ निर्णय घेणार असल्याची माहिती जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दीली. यावेळी पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रिय कार्याध्यक्ष जयदिप कवाडे,महाराष्ट्र प्रदेश युवकाध्यक्ष संजय भय्या सोनवणे, जिल्हा युवक अध्यक्ष सिद्धार्थ घोडेराम, सोमनाथ घोडेराम,अल्पसंख्यांक आघाडीचे अब्बास शेख,युवा नेते कपिल लिंगायत,आंनद कडाळे इत्यादी प्रमुख उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here