क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचा जीवनपट लोकांना समजण्यासाठी राहुल सिनेमांमध्ये उद्या 8 तारखेला दुपारचा 1शो फ्री- अशोक भाऊ देवकर.

सत्यशोधक या चित्रपटातून महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर उलघडणार- अशोक भाऊ देवकर

इंदापूर: “धर्म व्यवस्थेच्या गुलामगिरीतून भारतीय समाजाला मुक्त करण्यासाठी क्रांतीची ज्योत पेटवणारे महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारा ‘सत्यशोधक’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला इंदापुरात आहे. या चित्रपटातून महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर उलगडण्यात येणार आहे म्हणूनच उद्या राहुल सिनेमा इंदापूर येथे या चित्रपटाचा शो मी फ्री ठेवला आहे असे अशी माहिती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पुणे जिल्हा संघटक पै अशोक देवकर यांनी दिली. पुढे ते म्हणाले की,”गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची खूप चर्चा सुरू आहे.अभिनेते संदीप कुलकर्णी हे या चित्रपटात महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमिका साकारली आहे.

उद्या दुपारी १२ ते ३ हा शो राहुल सिनेमा येथे फ्री मध्ये ठेवण्यात आलेला आहे त्यासाठी ज्यांना सिनेमा पाहायचा आहे त्यांनी 9730790028 या नंबर वर कॉल करून आपली बुकिंग करून घ्यावी असे अशोक देवकर यांनी आवाहन केले आहे.या चित्रपटाविषयी अधिक माहिती देताना पैलवान अशोक देवकर म्हणाले की,”महात्मा फुले यांच्या विचारांची उत्तम मांडणी या चित्रपटात करण्यात आली आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे कार्य बघता एका चित्रपटातून त्यांचे विचार मांडता येऊ शकत नाहीत. त्यांच्या आयुष्यावर आधारित आणि त्यांचे वेगवेगळे विचार मांडणारे काही चित्रपट अजून बनायला हवेत. या चित्रपटातून देखील महात्मा फुले यांचे विचार सर्वदूर पोहोचवण्याचे काम होणार आहे. त्यामुळे हा चित्रपट सगळ्यांनी आवर्जून पाहायला हवा”. असेही अशोक देवकर म्हणाले त्यामुळे उद्या आता दुपारी बारा वाजता राहुल सिनेमांमध्ये प्रचंड गर्दीत सत्यशोधक सिनेमा पाहिला जाईल एवढे मात्र नक्की.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here