अवैध वाळू उत्खननमुळे नुकसानग्रस्तांना घरांना मदत करू – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

👉 विधानसभेत आ. निकोले यांची प्रश्नाद्वारे मागणी
वैभव पाटील (प्रतिनिधी) – अवैध वाळू उत्खनन मुळे नुकसानग्रस्तांना घरांना मदत करू अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 128 डहाणू (अ.ज.) विधानसभा आमदार विनोद निकोले यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नांवर मंत्र्यांचे उत्तर दिले आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या विधानसभेत तारांकित प्रश्न क्र :- 59421 नरपड (ता. डहाणू जि. पालघर) येथील समुद्रकिनाऱ्या वरून अवैध वाळू उत्खनन होत असल्याबाबत चर्चा सुरु असताना विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी आमदार निकोले यांना बोलण्याची संधी दिली असता, आ. निकोले म्हणाले की, पालघर जिल्ह्यातील 128 डहाणू (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील विषय असून डहाणू मध्ये डहाणू खाडी ते पारनाका ते नरपड पर्यंत समुद्र किनाऱ्यावर फार मोठ्या प्रमाणावर अवैध रेतीचे उत्खनन होत असते आणि समुद्राच्या भरती मुळे पाण्याच्या दबावामुळे गेल्या 02 वर्षात 20 ते 25 घरांच्या भिंती कोसळलेल्या आहेत. या घरांचे पंचनामे करून यांना भरपाई मिळेल का ? आणि अजूनही अवैध वाळू उत्खनन चालूच आहे त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही होईल का ? असा प्रश्न मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांनी उपस्थित केला त्यावर महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर देतांना म्हणाले की, निश्चितपणे पालघर जिल्हाधिकारी यांना सूचना देऊ, सर्वेक्षण करू तशी वस्तुस्थिती असेल तर मदत करण्यात येतील. आणि अवैध उत्खनन बाबत कार्यवाही करण्याचे आदेश देत आहे, असे त्यांनी विधानसभेत स्पष्ट सांगितले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here