अवैधरित्या गांजा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर पोलिसांची कारवाई, वाचा सविस्तर वृत्त.

करमाळा (प्रतिनिधी: देवा कदम )करमाळा तालुक्यातील दाहीखिंडी येथील एका शेतकऱ्याने आपल्या घरासमोरील शेतात अवैधरित्या गांजा सदृश्य वनस्पती लावल्याने त्याच्यावर करमाळा तालुक्यातील पोलिसांच्या वतीने कारवाई करण्यात आली आहेे .याबाबत अधिक माहीती अशी की, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल अहिरे यांना या बाबत गुप्त माहिती मिळाली त्या आधारे ही कारवाई करण्यात आली. सदरचा प्रकार दिनांक 25 रोजी शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास गट क्र.49 /2/ येथे उघडकीस आला आहे .अंकुश शिंदे (वय 58) असे गुन्ह दाखल झालेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे .त्यांनी आपल्या शेतात अर्धा फुटापासून साडे तीन फुटापर्यंत गांजा सदृश्य झाडांची लागवड केली होती.सदर झाडांचे वजन साडेसहा किलो भरले त्यानंतर 50 ग्रॅम मुद्देमाल हा तपासणीसाठी पाठविण्यात आल्यानंतर संपूर्ण मुद्दे मालाची किंमत अंदाजे 45 हजार पाचशे रुपये नोंदवण्यात आली याबाबत अधिक माहिती अशी मिळाली की धाहिखिंडी येथे अवैधरित्या गांजा लागवड करण्यात आल्याबद्दल उपविभागीय पोलिस अधिकारी विषाल अहिरे यांना माहिती मिळाली होती .त्यांनी लागलीच करमाळा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना ही माहिती कळविली .कोकणे यांनी पोलिस उपनिरीक्षक प्रवीण साने यांच्या पथकासह संबंधित ठिकाणी जाऊन तेथील माहिती घेतली त्यावेळी अंकुश राम शिंदे यांनी त्यांचे शेत जमीन गट क्र.49/ 2/ ब मधील राहत्या घराच्या समोर असलेल्या मोकळ्या जागेत गांजा सद्रुश्य वनस्पतीची लागवड करून त्याची जोपासना केली असल्याचे पाहणीतून दिसून आले. घटनेचा पुढील तपास करमाळा पोलिस करीत आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here