अवसरी विकास सोसायटीच्या चेअरमन पदी दत्तात्रय मारुती मगर यांची बिनविरोध निवड.

अवसरी विकास सोसायटीच्या चेअरमन पदी दत्तात्रय मगर यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. कर्मयोगी कारखान्याचे संचालक श्री. शांतीलाल शिंदे यांनी सोसायटीच्या चेअरमन पदाचा राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त होती, त्यामुळे आज एक मताने संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये दत्तात्रय मगर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. श्री. आप्पासाहेब जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रेय मगर यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. सामाजिक काम करत असताना त्यांनी सर्वसामान्य लोकांच्या अडचणी जाणून घेऊन सोडण्याचा प्रयत्नही केला. गोरगरीब जनतेच्या अडचणी जाणून घेऊन शक्य होईल तेवढी मदत करण्याचा त्यांनी प्रयत्न करत असतात आणि हेच काम पाहून आप्पासाहेब जगदाळे यांच्या मार्गदर्शनामुळे आज त्यांची अवसरी विकास सोसायटीच्या चेअरमन पदी निवड करण्यात आली. यावेळी कर्मयोगी कारखान्याचे संचालक शांतीलाल शिंदे, कर्मयोगी कारखान्याचे माजी संचालक श्रीमंत शिंदे, अवसरी लिफ्टचे सचिव राजेप्रताप शिंदे ,सामाजिक कार्यकर्ते रवींद्र काटे, प्रकाश मगर, डॉ. नागेश शिंदे, गणेश मोरे ,योगेश सावंत विजय कांबळे ,राहुल मरळे ,सुनील घनवट, घळके सर, ग्रामपंचायत सदस्य पप्पू कांबळे, बारीकराव शिंदे, अंगद तावरे ,नितीन कांबळे तलाठी पाटील साहेब, इंदापूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक अण्णा ढावरे व अवसरीतील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here