अवसरी-वडापुरी या ‘झंडू बाम’ नावाच्या रस्त्याचे काम लवकरच मार्गी लागणार- खासदार सुप्रिया सुळे.

संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांचा वडापुरी गटातील गाव भेट दौरा आज संपन्न झाला. या दौऱ्यामध्ये प्रत्येक गावामध्ये लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. हा दौरा अवसरीमध्ये आल्यानंतर चर्चा झाली ती अवसरी वडापुरी झंडू बाम रस्त्याची, तेथील उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी सुप्रियाताईंना सांगितले की,”हा वडापुरी अवसरी रोड जिल्हा परिषदकडे होता त्यामुळे हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी थोडा वेळ गेला ,परंतु सद्यस्थितीत पी .डब्ल्यू. डी. कडे हा रस्ता आहे” .त्यावर सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले की, “ह्या रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लागल्याचे आपणास पाहावयास मिळेल .आणि त्याचबरोबर अवसरी गावातील ओढ्यावरचा बंधारा याचेही काम मार्गी लावण्याचा आम्ही प्रयत्न करू” असे सुप्रिया सुळे यांनी उपस्थित लोकांना आश्वासन दिले.या कार्यक्रमासाठी प्रदीप दादा गारटकर, प्रताप आबा पाटील ,अतुल झगडे, अमोल भिसे, शुभम निंबाळकर, सचिन सपकळ ,गोटू पांढरे इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर अवसरी गावातील अवसरी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सोमनाथ जगताप, मेजर शांतीलाल सावंत, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग कांबळे ,माजी उपसरपंच चंद्रकांत कवितके. डॉ. नागेश शिंदे ,नंदकुमार कांबळे ,बापूराव शिंदे, हनुमंत घोडके, राहुल मरळे, इत्यादी बहुसंख्य अवसरीतील ग्रामस्थ उपस्थित होते.



अखेर सुप्रियाताईंच्या गाड्यांचा ताफा अवसरी-वडापुरी रोडनेच गेला: गेलं काही दिवसात झेंडू बाम रस्ता हा एक चर्चेचा विषय बनला होता. जनता एक्सप्रेस मराठी न्यूजने याबाबत विश्लेषणात्मक लेख लिहून या रस्त्याकडे लक्ष वेधले होते आणि याच प्रश्नास अनुसरून भाजपाचे तालुकाध्यक्ष यांनी या रस्त्यावरून प्रवास करा असे आवाहन केले होते, याच आवाहनाला प्रतिसाद देत खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्याला याच रस्त्यावरून जायचं आहे असे ठरवले आणि त्यानुसार त्यांनी या रस्त्यावरून प्रवास केला.



 मदतीचा हात: भेटीदरम्यान अवसरीत अपघातामध्ये दोन्ही पाय गमावलेले आप्पा सुतार यांना तातडीने तीन चाकी इलेक्ट्रॉनिक सायकल मिळेल असे आश्वासनही त्यांना सुप्रियाताईंनी दिले. अवसरी गावातील एका मुलीसाठी हृदयाची शस्त्रक्रियेसाठी सुप्रिया ताईंनी मदत करू असे ठामपणे सांगितले.आणि दुसरी एक महिला मणक्याच्या आजाराने त्रस्त असून त्या महिलेलाही दवाखान्याची पूर्ण मदत करू असे सांगीतले.



 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here