अवसरी येथील श्री हनुमान विद्यालयाचा शंभर टक्के निकाल. गुणांमध्ये मुलींनी मारली बाजी ..

इंदापूर तालुक्यातील अवसरी येथील श्री हनुमान विद्यालयाचा इयत्ता दहावी मार्च 2023 चा निकाल शंभर टक्के लागला असून एकूण 26 विद्यार्थ्यांपैकी विशेष श्रेणीमध्ये 14 ,प्रथम श्रेणी 8 द्वितीय श्रेणीत 3 व उत्तीर्ण 1 अशा प्रकारे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयातील भरघोश यश मिळवणारे पहिले पाच क्रमांक पुढील प्रमाणे
१)प्रथम- कु. पुनम नंदकुमार कवितके- 92.60%
२)द्वितीय- कु. ज्योती महादेव बोराटे- 88.40%
३)तृतीय- कु. प्रज्ञा श्यामराव बाबर- 87.60%
४)चतुर्थ- कु.सिद्धी शरद झगडे- 86.40%
५) पंचम – चैतन्य लहू झगडे -85.00%
सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष अरुणदादा शिंगटे,विद्यालयाच्या मार्गदर्शिका व सचिव सौ. विजया शिंगटे मॅडम, सहसचिव अमित शिंगटे आणि सर्व संचालक तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पी.व्ही. लोंढे सर व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here