इंदापूर तालुक्यातील अवसरी बेडशिंगे ग्रुप ग्रामपंचायत मधील चंद्रकांत कवितके यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे त्या रिक्त झालेल्या जागेवर उपसरपंच पदी सौ. संगीता आदित्य शिंदे यांची एक मताने बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच संदेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दि.३ नोव्हेंबर रोजी झालेल्या विशेष सभेत उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. यावेळी ग्रामसेविका रूपाली व्यवहारे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी अवसरी बेडसिंगे ग्रामपंचायतचे सदस्य सोमनाथ जगताप, चंद्रकांत कवितके, पांडुरंग कांबळे, सौ. ऋतुजा समाधान मोरे, सौ. सुनंदा उत्तम कदम, सौ. मनीषा नाना उंबरे, नितीन यादव, ग्रामसेवक रूपाली व्यवहारे ,अजित पाटील (तलाठी ) कर्मयोगी कारखान्याचे विद्यमान संचालक शांतीलाल शिंदे, पत्रकार अगंध तावरे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र काटे, निवृत्ती मगर, डॉ. नागनाथ शिंदे, माणिक शिंदे ग्रामपंचायत कर्मचारी नितीन कांबळे, असे सर्व सदस्य कर्मचारी तलाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपसरपंच पदावर निवड झालेल्या सौ. संगीता शिंदे यांनी जनता एक्सप्रेस मराठी न्यूजशी बोलताना सांगितले की, माझ्यावर ग्रामपंचायत सरपंच व ग्रामपंचायत मधील सर्व सदस्यांनी आणि गावातील ग्रामस्थांनी विश्वास देऊन उपसरपंच पदाची जबाबदारी दिल्यामुळे मी समाधानी आहे. मला गावासाठी खूप काही करून दाखवायचे आहे. गावाचा विकास करायचा आहे .तसे मला पहिल्यापासूनच सामाजिक कामाची आवड होती, आपण काहीतरी गावासाठी ,समाजासाठी गावातील गोरगरीब जनतेसाठी करून दाखवावे अशी माझी इच्छा होती .आणि मला घरच्यांचा सुद्धा खूप त्यासाठी पाठिंबा होता. पुढे त्या म्हणाल्या की, माझे पती आदित्य शिंदे यांनी मला पाठिंबा देऊन आणि माझ्या मनातील गावाच्या विकासाचे स्वप्न पाहून मला ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उभे केले आणि अवसरी गावातील ग्रामस्थांनीही मला भरभरून सपोर्ट करून भरघोस मतांनी निवडून दिले. सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून उपसरपंच पदाची धुरा माझ्या हातामध्ये दिली त्यामुळे मी नक्कीच गावाच्या विकासासाठी गोरगरीब जनतेसाठी जेवढे मला करता येईल तेवढे मी योगदान देईल. सर्वसामान्य लोकांच्या गोरगरीब जनतेच्या अडचणी समजून घेऊन सोडवण्याचाही प्रयत्न करीन, सर्वांना बरोबर घेऊन काम करेन अशा भावना जनता एक्सप्रेस मराठी न्यूजशी बोलताना उपसरपंच सौ. संगीता आदित्य शिंदे यांनी व्यक्त केल्या. जनता एक्सप्रेस मराठी न्यूज कडून उपसरपंच सौ. संगीता आदित्य शिंदे यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.