इंदापूर:अवसरी गावातील युवा कार्यकर्ता सोमनाथ जाधव व नागेश शिंगटे यांचा वाढदिवस काल मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला ,सोमनाथ जाधव यांच्या मित्र मंडळीनी खूप मोठ्या प्रमाणावर वाढदिवसाला हजेरी लावली होती ,कारण सोमनाथ जाधव यांचे अवसरी मध्ये आणि अवसरी पंचक्रोशीतील सगळ्या गावांमध्ये मोठा जनसंपर्क आहे त्यामुळेच वाढदिवसासाठी खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे दिसून आले. यावेळी अवसरी गावचे सरपंच श्री संदेश शिंदे हे देखील उपस्थित होते, सरपंच संदेश शिंदे यांची काम करण्याची पद्धत आणि माणसे जोडण्याची पद्धत खूप वेगळी आहे कारण सरपंच संदेश शिंदे हे अवसरी गावातील कोणाचाही वाढदिवस असला मोठ्याचा असो किंवा लहानांचा असो त्या वाढदिवसासाठी सगळे ते नियोजन करून स्वतः खर्च करून वाढदिवस साजरा करतात ,त्यामुळे युवा पिढी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे कोणालाही कशाची ही अडचण आली तरी ते मदत करतात. त्यामुळे अवसरी गावचे सरपंच श्री संदेश शिंदे यांनाही अवसरी व अवसरी पंचक्रोशीतील गावांमध्ये विशेष स्थान प्राप्त झाले. या वाढदिवसासाठी लहान चिमुकली सुद्धा मागे राहिले नाहीत त्यांची ही उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती. सोमनाथ जाधव यांचा स्वभावच असा आहे मैत्री झाली तर त्या मित्रासाठी त्यांच्या अडचणीसाठी स्वताला कितीही झळ बसली तरी ते मागे बघून पाहत नाहीत त्यांना ते मदत करतातच ,आणि त्याच मुळे सगळी तरुणाई त्यांच्याकडे आकर्षिली आहे .या त्यांच्या वाढदिवसासाठी त्यांचे जवळचे सरपंच श्री संदेश शिंदे. सार्थकराजे तावरे, अजित साळुंके, संजय झगडे प्रसाद शिंदे, शहाजी सावंत ,तात्यासाहेब कांबळे, लक्ष्मण जगताप, दिनेश शिंदे सोमनाथ कवितके, बापू जाधव ,संकेत देवकर, सुरज जाधव, संदेश सावंत, शुभम माने ,स्वप्नील घोगरे ,नंदकुमार कांबळे नितीन कांबळे, भैया गायकवाड, सागर कवितके, दादा कवितके ,कृष्णा साळुंखे दीपक जाधव, आकाश माने, सागर शिरतोडे, असे अनेक मित्रमंडळी वाढदिवसासाठी उपस्थित होती आणि या वाढदिवसाचे नियोजन सरपंच संदेश शिंदे मित्रपरिवार या ग्रुपने केले.