अवसरीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

अवसरी मध्ये काल लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंती तयारीची लगबग गेले आठ दिवसापासून चालू होती. या जयंतीचे आयोजन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवा प्रतिष्ठान अवसरी यांनी केले होते. प्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले , विविध मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले. जयंती स्थळी विद्युत रोशनाई अतिशय सुंदर केली गेली होती , प्रतिमेचे पूजन व मनोगत झाल्यानंतर भव्य आणि दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. शेवटी भोजनाचाही कार्यक्रम युवा प्रतिष्ठानने ठेवला होता. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवा प्रतिष्ठान अवसरीतील युवक पप्पू कांबळे ,विजय कांबळे, संतोष कांबळे ,नवनाथ कांबळे, नितीन कांबळे ,नंदकुमार कांबळे, राहुल पवार, सुनील पवार ,किशोर कांबळे, सचिन कांबळे, अमोल कांबळे ,गोविंद कांबळे ,माऊली नाईकनवरे इत्यादी या सर्व युवकांनी या जयंतीचे नियोजन केले होते. अतिशय शिस्तबद्ध व शांततेत व उत्साहामध्ये ही जयंती साजरी करण्यात आली . या जयंती साठी अवसरी व अवसरी पंचक्रोशीतील बहुसंख्य लोक उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here