अवसरी मध्ये आज हाफ पीच टेनिस बॉल क्रिकेटचा थरार पाहावयास मिळाला, प्रथम क्रिकेट पीच चे पूजन कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक शांतीलाल शिंदे व ग्रामपंचायत सदस्य समाधान मोरे यांनी केले .संघर्ष अवसरी क्रिकेट क्लबने या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते .या स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला .बाहेर गावाकडील लांबून क्रिकेट टीम व क्रिकेट चाहते या स्पर्धेसाठी आले होते .या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 11000 हजार रुपये जिजाऊ इंदापूर तालुका बचत गट असोसिएशन इंदापूर यांनी ठेवले होते. तर द्वितीय पारितोषिक 5 हजार रुपये योगेश बन (चेअरमन बेडशिंगे )व समाधान मोरे ग्रामपंचायत सदस्य अवसरी यांनी ठेवले होते. तृतीय पारितोषिक दोन हजार रुपये प्रवीण पवार प्रगतशील बागायतदार अवसरी यांनी ठेवले होते. या स्पर्धेसाठी जवळपास 18 क्रिकेट टीम स्पर्धक म्हणून आल्या होत्या ,अतिशय रोमहर्षक लढती पाहावयास मिळाल्या, क्रिकेट पाहण्यासाठी अवसरी व अवसरी पंचक्रोशीतील क्रिकेट चाहते क्रिकेट सामना पाहण्यासाठी आले होते .शेवटचा अंतिम सामना वेताळ महाराज क्रिकेट क्लब अकलूज विरुद्ध शिरसोडी क्रिकेट क्लब यांच्यात झाला अतिशय अटीतटीच्या या सामन्यात शिरसोडी क्रिकेट क्लब या संघाने बाजी मारली. अंतिम सामना रोमहर्षक झाला क्रिकेटचे चाहते श्वास रोखून एकटक नजर लावून या अंतिम सामन्याचा आनंद घेत होते. शेवटची ओव्हर वेताळ महाराज क्रिकेट क्लब अकलूज चा बॉलर माऊली चव्हाण याची होती ,तर त्याचा सामना करण्यासाठी शिरसोडी क्रिकेट क्लब चा बॅट्समन स्वप्निल नरुटे होता शिरसोडी क्रिकेट क्लब ला शेवटच्या ओव्हरमध्ये 14 रन्स करायचे होते ,शिरसोडी क्रिकेट क्लब चा बॅट्समन स्वप्निल नरूटे यांनी अतिशय तुफानी फटकेबाजी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला त्याचे सर्वांनी कौतुक केले. या स्पर्धेसाठी आयोजक म्हणून विठ्ठल राहीगुडे ,स्वागत गायकवाड, शिवाजी वीर ,यांनी काम पाहिले, तर संयोजक म्हणून संजय शिर्के, पप्पू बोडके, नवनाथ बोडके युवराज वीर, सौरभ साळुंखे ,रमजान पठाण, अतुल मोरे, गुलाटी मदने ,सचिन वीर, यांनी काम पाहिले. अतिशय शांततेत आणि आनंदात ही स्पर्धा पार पडली.