अवसरीमध्ये यावर्षीही अग्नीतांडव,१० एकर ऊस जळून खाक.

इंदापूर:(उपसंपादक: संतोष तावरे) अवसरीमध्ये आज पुन्हा एकदा आज मोठ्या प्रमाणावर अग्नी तांडव होऊन जवळपास दहा एकर ऊस जळून खाक झाला आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली का कोणी लावली हे अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नाही. गेल्या वर्षी याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अग्नि तांडव झाले होते. त्याच ठिकाणी आजही अग्नी तांडव झाले असून यामध्ये कल्याण शिंदे व प्रकाश गायकवाड या शेतकऱ्यांचा मिळून जवळपास दहा एकर ऊस जळून खाक झाला आहे .जवळच ऊस तोडत असलेल्या टोळीतील लोकांनी व अवसरी मधील काही तरुण युवक यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षदर्शींच्या मते ही सर्व लोक जर घटनास्थळी त्यावेळेस पोचलीच नसती तर पूर्ण अवसरीलाही अग्नी तांडवाचा वेेढा आला असता परंतु या सर्व लोकांना आग विझविण्यात यश आल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
दरम्यान इंदापूर नगरपालिकेची गाडी घटनास्थळी दाखल झाली होती परंतु तोपर्यंत दहा एकर पूर्णपणे ऊस जळून खाक झाला होता. अशाच प्रकारचे संकट बळीराजावर पुन्हा येेऊ नये म्हणून जनता एक्सप्रेसने परवाच एक बातमी लावली होती.https://janataexpressmarathinews.com/भांडगाव-अवसरी-व-अवसरी-वडा/

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here