अवसरीमध्ये केळी भरून चाललेल्या पिकअपला अपघात, वारंवार अपघातामुळे रस्त्याच्या अरुंदीकरणाचा प्रश्न ऐरणीवर.

अवसरीमध्ये केळीने भरलेला पिकअप पलटी झाला. सुदैवाने तिघांचा जीव थोडक्यात बचावला. अवसरीतील प्रगतशील शेतकरी हनुमंत विष्णू मोरे यांची केळी घेऊन जाणारा पिकअप दत्तात्रेय जाधव यांच्या घराच्या पाठीमागून जाणाऱ्या रस्त्यावर ,अरुंद रस्त्यामुळे घसरून पलटी झाला मात्र या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पिकपचे व केळीचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अवसरी ते मोरे मळा दीड किलोमीटरचा रस्ता, परंतु रस्त्यालगत असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी, रस्त्यालगतची असणारी जमीन कोरल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे,तो रस्ता आहे की पायवाट हाच प्रश्न निर्माण होत आहे. ठिकठिकाणी रस्त्यावरती पाण्याचे मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. या रोडवरचा हा तिसरा अपघात असून त्याच ठिकाणी हे तिन्ही अपघात झाले आहेत. परंतु सुदैवाने या तिन्ही अपघातामध्ये जीवितहानी झाली नाही. परंतु प्रशासन मात्र जीवितहानी झाल्यानंतरच या रस्त्याकडे लक्ष देणार का ? असा प्रश्न सर्वसामान्य लोकांमध्ये पडत आहे. प्रशासनाने तातडीने पावले उचलून नकाशा प्रमाणे रस्त्याची रुंदी करून द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here