अवसरी:अवसरीमध्ये उद्या जोतिबाची यात्रा आनंदमयी वातावरणात साजरी होणार आहे .मागील दोन वर्षापासून कोरोना महामारी मुळे यात्रा होऊ शकली नाही. त्यामुळे प्रथमच या वर्षी जोतिबाची यात्रा मोठ्या आनंदाने साजरी केली जाणार आहे .यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. विद्युत रोषणाईने मंदिर व मंदिरापुढील परिसर झळकून निघाला आहे. ज्योतिबाच्या काठीचा मान अवसरी सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे विद्यमान संचालक श्री. दिनेश शिंदे यांना दिला जातो. यात्रेदिवशी सकाळी सात वाजता देवाची पूजा व अभिषेक घातला जातो. दुपारी बारा वाजता आरती व महापूजा केली जाते. मंदिरावर गुलाल व खोबऱ्याची उधळण केली जाते .आणि गुलाल व खोबऱ्याची उधळण झाल्यानंतर महाप्रसाद असतो. यावर्षी महाप्रसाद विठ्ठल माणिक शिंदे यांच्या तर्फे दिला जाणार आहे . यात्रेसाठी अवसरी व अवसरी पंचक्रोशीतील सर्वांनी यात्रेसाठी महाप्रसादासाठी आवर्जून यावे असे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज सी बोलतानी विशाल शिंदे, मा.पोलीस जयसिंग जाधव, डॉक्टर नागेश शिंदे ,अमित जाधव, सिताराम जाधव ,सुनील शिंदे, पांडुरंग राहीगुडे ,तुकाराम शिंदे यांनी सांगितले आहे.