अवसरीच्या ग्रामपंचायतीवर उपसरपंचपदी महिलाराज…ऋतुजा समाधान मोरे उपसरपंच पदी विराजमान.

आजादी का अमृत महोत्सव “मेरी मिट्टी मेरा देश” अभियान उत्साहात..
इंदापूर: ( उपसंपादक : संतोष तावरे) अवसरी ग्रामपंचायत मध्ये काल दि. 14 ऑगस्ट रोजी आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रम समारोप उपक्रमांतर्गत ” मेरी मिट्टी मेरा देश” अभियान राबविण्यात आले. तसेच स्वातंत्र्य सैनिकांना व वीरांना वंदन करण्यात आले . सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पंच प्रण शपथ घेण्यात आली . ध्वजारोहण करण्यात आले. अवसरीचे वीर सैनिक नाना माने यांच्या मुलाचा वृक्ष तसेच हार फेटा देऊन सन्मान करण्यात आला. आणि हा सगळा कार्यक्रम झाल्यानंतर सौ .ऋतुजा समाधान मोरे यांची एकमताने उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.सौ. संगीता आदित्य शिंदे ह्या या अगोदर उपसरपंच पदावर कार्यरत होत्या , परंतु त्यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे उपसरपंच पदाची जागा रिक्त झाली होती. आज अवसरी ग्रामपंचायत मध्ये सरपंच संदेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ऋतुजा समाधान मोरे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेविका रूपाली रंगनाथ व्यवहारे यांनी काम पाहिले. आज उपसरपंच या पदावर निवड झालेल्या ऋतुजा समाधान मोरे यांनी जनता एक्सप्रेस मराठी न्यूजशी बोलताना सांगितले की , माझ्यावर ग्रामपंचायत सरपंच संदेश शिंदे, उपसरपंच संगीता आदित्य शिंदे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य मेंबर व गावातील ग्रामस्थांनी विश्वास देऊन उपसरपंच पदाची जबाबदारी दिल्यामुळे मी समाधानी आहे. पुढे त्या म्हणाल्या की, आत्ता सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून उपसरपंच पदाची धुरा माझ्या हातामध्ये दिली त्यामुळे मी नक्कीच गावाच्या विकासासाठी तत्पर राहीन. गोरगरीब जनतेसाठी जेवढे मला करता येईल तेवढे मी योगदान देईल. सर्वसामान्य लोकांच्या गोरगरीब जनतेच्या अडचणी समजून घेऊन सोडवण्याचाही प्रयत्न करीन, अशा भावना जनता एक्सप्रेस मराठी न्यूजशी बोलताना उपसरपंच सौ. ऋतुजा समाधान मोरे यांनी व्यक्त केल्या. जनता एक्सप्रेस मराठी न्यूज कडून सौ. ऋतुजा समाधान मोरे यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here