अंधेरी पोटनिवडणुकीच्या रिंगणातून भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी माघार घेतली आहे. यासंदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
यामुळे दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपच्या उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याचे आवाहन केले होते.
अंधेरी पोटनिवडणूक लढवावी की बिनविरोध करावी, यावरून भाजपमध्ये एकमत होत नव्हते. अंधेरी पोटनिवडणुकीबाबत भाजपमध्ये दोन भिन्न मतप्रवाह असल्याचे आता आले. निवडणूक लढवण्यासाठी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार व भाजपचे उमेदवार मुरजी पटेल आग्रही होते. परंतू या निवडणुकीत पराभव झाल्यास आगामी मुंबई पालिका निवडणुकीत भाजपला मोठा झटका बसेल व मुंबई पालिकेतील भाजपची पतच जाईल, असे स्थानिक नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगितल्याची माहिती आहे. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीबाबत विचार करावा, असे देवेंद्र फडणवीसांचे म्हणणे होते.यामुळे या पोटनिवडणुकीबाबतचा अंतिम निर्णय भाजपचे केंद्रीय नेतृत्वच घेणार होते. त्यानुसार आता अंधेरी पोटनिवडणुकीच्या रिंगणातून भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी माघार घेतली आहे.
Home Uncategorized अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये भाजपाची माघार, ऋतुजा लटके यांचा...