अवकाळी पावसाचे संकट दूर व्हावे यासाठी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी घातले लक्ष्मी-नृसिंहाला साकडे

हर्षवर्धन पाटील यांनी घेतले लक्ष्मी-नृसिंहाचे दर्शन
इंदापूर : प्रतिनिधी दि.20/11/21
          माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्री क्षेञ निरा नरसिंहपूर (ता. इंदापूर ) येथे प्रसिद्ध श्री लक्ष्मी-नृसिंहाचे शनिवारी (दि.20 ) दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली.भीमा व नीरा नदीच्या संगमावरती वसलेले श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर हे दक्षिणेकडील काशी म्हणून ओळखले जाते. मंदिरांमध्ये दर्शन घेतलेनंतर हर्षवर्धन पाटील यांचा श्री लक्ष्मी नृसिह देवस्थान ट्रस्टच्या वतीने अविनाश दंडवते यांनी सत्कार केला. सध्याचे अवकाळी पावसाचे संकट दूर व्हावे व शेतकरी सुखी समाधानी रहावा, असे साकडे श्री नृसिंह चरणी घातल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी संगितले. याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी श्रीक्षेत्र नीरा नरसिंहपूर येथे चालू असलेल्या विकास कामांची माहिती घेतली. यावेळी माजी सरपंच संतोष मोरे, माजी उपसरपंच विलास ताटे-देशमुख, विजय सरवदे, अजय काळे व कार्यकर्ते उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here