इंदापूर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बाग, गहू,फळबागा, इत्यादींचे नुकसान झालेले असून तातडीने प्रशासनाने पंचनामा करून घ्यावेत अशा सूचना आज आमदार दत्तात्रय भरणे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना फोनद्वारे संवाद साधून दिल्या.अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचं या पावसामुळे नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे.निसर्गाचा लहरीपणा भर उन्हाळ्यामध्येही सुरुच आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक ठिकाणी तापमानात मोठी वाढ झाली होती. अनेक जिल्ह्याचा तापमानाचा पारा वाढला आहे. अशातच अचानक अवकाळी पाऊस हजेरी लावल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.बुधवारी 15 मार्च रोजी मध्यरात्री काही प्रमाणात पावसाच्या सरीही कोसळल्या होत्या. गुरुवारी 16 मार्च रोजी रात्री आठ वाजल्यापासून अवकाळी पावसाने चांगलाच जोर धरला. पावसाचे प्रमाण जरी कमी असले तरी वाऱ्याचे प्रमाण मोठे होते त्यामुळे तोडणीला आलेला गहू, हरभरा व इतर फळपिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.आणि याच सर्व गोष्टीचा विचार करून आमदार दत्तात्रय भरणे यांनी जिल्हाधिकारी यांना पंचनामा करण्याच्या सूचना देऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत कशी होईल याकडे लक्ष दिले आहे.
Home Uncategorized अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करा- आमदार दत्तात्रय भरणे यांनी...