बारामती लोकसभा मतदार संघ पिंजून काढण्याच्या दृष्टीने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या दि.२२ ते २४ रोजी असा तीन दिवसीय दौरा करणार आहेत.यात त्यांचे सर्वच विधानसभा मतदार संघात सुमारे २१ कार्यक्रम आहेत. हा दौरा यशस्वी करण्यासाठी भाजपच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या दौऱ्या मागे ‘मिशन बारामती’ अंतर्गत बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्याचा हेतू घेऊनच त्या इतर तालुक्याबरोबरच इंदापूर तालुक्यातही येत आहेत.शनिवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता वकील, डॉक्टर, उद्योजक, व्यापारी व नवमतदार युवक यांच्याशी गुरुकृपा मंगल कार्यालय येथे संवाद साधणार आहेत.आता भारताच्या अर्थमंत्री इंदापुरात येणार आहेत आणि त्या संवादही साधणार आहेत ही गोष्ट अभिमानास्पद असली तरीही या सर्व गोष्टींमध्ये गुरुकृपा मंगल कार्यालय इंदापूर रोडवरील अस्वच्छता अजूनही प्रशासनाला दिसली नाही का?असाच प्रश्न पडतो.कारण सद्य परिस्थितीमध्ये येथे कचरायुक्त अस्वच्छता आहे.त्याचप्रमाणे देशाच्या अर्थमंत्री येणार म्हणल्यानंतर सुरक्षिततेची ही काळजी प्रशासन घेणार यात शंका नाही परंतु या गुरुकृपा मंगल कार्यालय कडे जाणाऱ्या रोडवर चार-पाच फूट गवत/झाडी वाढलेली आहेत व त्या शेजारील भिंतीच्या पलीकडे सर्व शेती असून देशाच्या अर्थमंत्री येण्याच्या दृष्टीने हा रोड झाडाझुडपांमुळे सुरक्षित वाटत नाही त्यामुळे स्वच्छतेबरोबरच ही वाढलेली झाडी झुडपे त्वरित कापून करून त्या ठिकाणी गाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था होऊ शकते.
या रोडवर न्यायालया जवळील दोन चार खड्डे आहेत तेही त्वरित बुजवले तर जाणे येण्यासाठी काही अडचण येणार नाही त्यामुळे प्रशासनाने त्वरित याकडे लक्ष देऊन स्वच्छता, झाडे झुडपे व खड्ड्यांची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.देशाच्या अर्थमंत्री येण्याच्या निमित्ताने का होईना पण या भागातील स्वच्छता,खड्डे आणि झाडेझुडपे हे निघतील याच नागरिकांच्या अपेक्षा आहेत.