अरे व्वा..! चंद्रप्रभू इंग्लिश मेडीयम स्कूलच्या चिमुकल्यांनी केले महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर केले सर.

👉चंद्रप्रभू स्कूलच्या विद्यार्थी यांनी केला आगळा वेगळा विक्रम, कळसूबाईचे शिखर केले सर..
ता.16 नातेपुते – चंद्रप्रभू इंग्लिश मेडीयम स्कूल,नातेपुते यांनी 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थी यांची सहल एक आगळा वेगळा विक्रमच ठरला.संस्थेचे चेअरमन श्री.नरेंद्र गांधी यांच्या संकल्पनेतून आणि संस्थेचे सेक्रेटरी श्री.विरेंद्र दावडा,खजिनदार संजय गांधी आणि सर्व मेंबर यांच्या मार्गदर्शनातून मुख्यध्यापिका सौ. ढोपे मॅडम आणि सर्व स्टाफ यांच्या नियोजनातून महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई शिखर सर करण्याचा ध्यास केला गेला. आणि आज 16/12/2022 रोजी हा ध्यास चंद्रप्रभू स्कूलच्या 11 ते 16 वर्षाच्या वयोगटातील 100 मुलांनी कळसूबाई शिखर सर करून दाखवले.अतिशय कठीण चढाई असताना सुद्धा मुलांनी विनाअडथळा ही पार करून आगळी वेगळी सहल करून दाखवली. पारंपारिक सहलींना बगल देवून चंद्रप्रभूने साहसी सहल करून एक आगळा वेगळा विक्रमच केला.आजपर्यंत कोणत्याच शाळेने कळसूबाई शिखर सहल केली नव्हती पण चंद्रप्रभू स्कूलने हे साहस करून महाराष्ट्राचे एव्हरेस्ट सर केले. यामध्ये 100 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्याचबरोबर शिवनेरी किल्ला, लेण्याद्री, ओझर, भंडारदरा धरण याठिकाणी भेटी दिल्या. अशी माहिती शाळेचे शिक्षक श्री. संजय वलेकर सर यांनी दिली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here