अमित शाह यांचेकडून हर्षवर्धन पाटील यांचे सहकारातील महत्व अधोरेखित .

इंदापूर :प्रतिनिधी दि.19/12/21
देशाची गृहमंत्री व सहकार मंत्री ना. अमितजी शाह यांनी राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा प्रवरानगर येथील सहकार परिषदेत केलेल्या सन्मानपूर्वक उल्लेखामुळे, हर्षवर्धन पाटील यांचे राज्यातील सहकार चळवळीतील महत्व अधोरेखित झाले आहे.
देशातील पहिली सहकार परिषद प्रवरानगर येथे शनिवारी ( दि.18) राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुढाकाराने संपन्न झाली. ना.अमितजी शाह देशाचे पहिले सहकार मंत्री झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समवेत हर्षवर्धन पाटील व राधाकृष्ण विखे पाटील यांनी अनेक वेळा नवी दिल्लीत ना.अमितजी शाह यांची भेट घेऊन सहकारी चळवळ बळकट करण्यासाठी अभ्यासपुर्ण संवाद साधला आहे. या भेटींच्या पार्श्वभूमीवर प्रवरानगर येथे अमित शाह यांनी भाषणात देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील यांचेशी सहकार व साखर उद्योगावर होत असलेल्या संवादाचा आवर्जून नामोल्लेख केला व महाराष्ट्रातील सहकारी साखर उद्योगाला पूर्ण सहकार्य केले जाईल, असे जाहीर केले. त्यामुळे राज्यातील साखर उद्योगाला दिलासा मिळाला आहे. भाजप नेते हर्षवर्धन पाटील सुमारे 8 वर्षे राज्याचे सहकार मंत्री होते. सलग 8 वर्षे सहकार मंत्री पद भूषविलेले हर्षवर्धन पाटील हे राज्यातील पहिलेच नेते आहेत. तत्पूर्वी पणनमंत्री म्हणूनही प्रभावीपणे काम करताना हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या कामाचा देशपातळीवर ठसा उमटवला आहे. हर्षवर्धन पाटील यांना गाव पातळीपासूनच्या सहकार क्षेत्राचा तब्बल 40 वर्षाचा अनुभव आहे. या अनुभवाच्या जोरावर सध्या भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकार चळवळीच्या मजबुतीकरणाकरिता महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
 
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here